शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीप्रकरणी पाचजणांना अटक

By admin | Updated: December 25, 2015 00:23 IST

सांगलीतील प्रकार : कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका पदाच्या पेपरफुटीचा तपास सुरू असताना, औषध निर्माण अधिकारी पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे. दोन्ही परीक्षांचा पेपर फोडणारी कर्मचाऱ्यांची टोळी जिल्हा परिषदेतीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी छापखान्यातील कनिष्ठ बार्इंडर रामदास फुलारे याच्यासह पाचजणांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.अटक केलेल्यांमध्ये रामदास आनंदा फुलारे (वय ४२, रा. हुबालवाडी, ता. वाळवा), शशांक श्रीकांत जाधव (२५, वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सतीश शिवाजी मोरे (३६, कवलापूर, ता. मिरज), अशोक शामराव माने (३५, कामेरी, ता. वाळवा), शिवाजी पांडुरंग गायकवाड (३३, म्हाळुंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. हे संशयित पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्तीस आहेत. यातील फुलारे सध्या तरी मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. अन्य चार संशयितांना सकाळीच अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलीसप्रमुखांनी सांगितले.गेल्या महिन्यात आरोग्यसेविका व औषध निर्माण अधिकारी या दोन पदांची परीक्षा झाली. या परीक्षेत कॉपी करताना शाहीन जमादार हिला रंगेहात पकडले होते. तिच्यासह तिला मदत करणाऱ्या शाकीरा उमराणी या दोघींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघीही आरोग्यसेविका आहेत. दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची छपाई जिल्हा परिषदेच्या छापखान्यात झाली होती. त्यामुळे दोन्ही प्रश्नपत्रिका फुलारे याने बाहेर काढल्या होत्या. त्या त्याने संशयितांमार्फत उमेदवारांना गाठून पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यसेवक पदासाठी सात ते आठ लाख, तर औषध निर्माण अधिकारी पदासाठी दहा ते बारा लाख रुपये या दराने प्रश्नपत्रिकांची विक्री केली आहे. यासाठी त्यांनी स्वतंत्र खासगी लोकांची यंत्रणा राबविली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. किती उमेदवारांना त्यांनी प्रश्नपत्रिका पुरविल्या, याचा अद्याप उलगडा झाला नाही. (प्रतिनिधी)