पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या आणि नेमिष्टे गँग नावाने सक्रिय असलेल्या टोळीप्रमुखासह सदस्यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरिक्षकांनी या गँग विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. नेमिष्टे टोळीने इचलकरंजीसह हातकणंगले तालुका व जिल्हा परिसरात दहशत माजविण्यासह विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ७ सप्टेंबर २०२१ पासून तीन महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अक्षय नेमिष्टे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गावभाग, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गर्दी, मारामारी, शिवीगाळ, धमकी, गंभीर दुखापत, दरोडा, कट रचणे, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच साथीचे रोग अधिनियमांचे उल्लंघन असे विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
इचलकरंजीच्या नेमिष्टे गँगमधील पाच जण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST