शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

पणन मंडळाला पाच आमदारांचा विसर

By admin | Updated: September 29, 2016 01:18 IST

आठवडी बाजार निमंत्रण पत्रिका : मुश्रीफ, कुपेकर, सरूडकर, उल्हास पाटील, आबिटकरांना वगळले

कोल्हापूर : कृषी पणन मंडळाच्यावतीने कोल्हापूर शहरात शुक्रवारी (दि. ३०) आठवडी बाजार सुरू होत असून, त्याचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका काढताना ‘पणन’ विभागाला पाच आमदारांचा विसर पडला. आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, सत्यजित पाटील-सरूडकर, प्रकाश आबिटकर व उल्हास पाटील यांची नावे दिसत नाहीत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडतीच्या जोखडातून मुक्त केले. त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार अभियानांतर्गत प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर शहरातील आठवडी बाजाराचा प्रारंभ खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील मोकळ्या जागेत शुक्रवारी होत आहे. महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. यासाठी पणन मंडळाने जय्यत तयारी केली असून निमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे प्रमुख पाहुणे आहेत. महापौर अश्विनी रामाणे, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अमल महाडिक या सन्माननीय लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. पण या निमंत्रणपत्रिकेत आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील या पाच आमदारांची नावेच नाहीत. राजशिष्टाचारानुसार कोणत्याही शासकीय कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे नावे समाविष्ट करावी लागतात पण ‘पणन’ अधिकाऱ्यांनी तो डावलल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. याबाबत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे ‘ओएसडी’ सुभाष घुले यांना विचारले असता, कोल्हापूर शहरात बाजार सुरू होणार असल्याने शहराशेजारील आमदारांना निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले. आठवडी बाजार व एकूणच कार्यक्रमाच्या नियोजनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पुढाऱ्यांचा गरजेपेक्षा जरा जास्तच हस्तक्षेप दिसत आहे. त्यामुळेच पत्रिकेतील नावांचे राजकारण झाल्याची चर्चा सुरू आहे.