शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भडगावजवळ पाच लाखांचा नरक्या पकडला

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

दोघांना अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

मुरगूड : भुदरगड तालुक्यातील जंगलातील औषधी वनस्पती नरक्या कोल्हापूर येथे विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी भडगाव (ता. कागल) येथे शिताफीने पकडले. त्यांच्याकडून हौदाच्या टेम्पोसह नरक्याची दहा पोती पोलिसांनी जप्त केली. बाजारभावाप्रमाणे या नरक्याची अंदाजे किंमत पाच लाखांच्या घरात असून, अटक केलेल्या भीमराव महिपती कांबळे (वय ४५) व चालक धनाजी भाऊ झाटे (३८, दोघेही रा. काड्याचा हुडा, ता. भुदरगड) यांच्याकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : आज, रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुरगूड-कागल रस्त्यावर सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, स.पो.नि. चंद्रकांत मस्के, पोलीस उपनिरीक्षक रमेश ढांगे हे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करीत होते. भडगाव फाट्याजवळ असणाऱ्या एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर थांबून ते वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी निढोरीकडून कागलकडे जाणाऱ्या हौदा टेम्पो (एमएच ११-ए ६-३५२७)वरील चालक पोलिसांची नजर चुकवून जात होता. त्यावेळी अगदी शिताफीने पोलिसांनी त्या टेम्पोला पकडले. टेम्पोची झडती घेतली असता हौद्यामध्ये प्लास्टिकची व गोणपाटाची दहा पोती पोलिसांना दिसली. त्यामध्ये लाकडाचे बारीक बारीक तुकडे भरल्याचे दिसून आले. ते तुकडे नरक्या या औषधी वनस्पतीचे असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी टेम्पोचालकासह अन्य एकाला तत्काळ ताब्यात घेतले.जप्त केलेला नरक्या प्लास्टिकच्या आठ पिशव्या व दोन गोणपाटांतून कोल्हापूर येथे विक्रीसाठी नेला जात होता. त्याठिकाणाहून तो मुंबईकडे नेला जाणार होता, अशी धक्कादायक माहिती भीमराव कांबळे याने दिली. आपल्याला फोनवरून हा नरक्या कागल व कोल्हापूर शहराच्यामध्ये हायवेवर घेऊन येण्यास सांगितले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी जप्त केलेला नरक्या अंदाजे २०० किलोहून अधिक आहे. या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांबरोबर विशाल वाळेकर, हमीद शेख, एल. व्ही. धायगुडे, पोलीस कर्मचारी आवळकर, हुंबे, काशीद, संग्राम पाटील, कुंभार आदींनी भाग घेतला. मुरगूड पोलीस आरोपींकडून अधिक माहिती घेत आहेत. (वार्ताहर)