शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाच उड्डाणपूल, पाच भुयारी मार्ग वाहतूक समस्येवरील ‘मास्टर प्लॅन’ : पालकमंत्र्यांसमोर लवकरच प्रस्तावाचे सादरीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:56 IST

कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे

भारत चव्हाण ।कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिका आणि राज्य शासन यांनी सुरू केले आहेत. त्यातच भाग म्हणून शहरातील वर्दळीच्या विविध भागात पाच उड्डाणपूल तर पाच ठिकाणी भुयारी मार्गांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. लवकरच त्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले जाईल, त्यांच्या काही सूचना असल्यास त्यानुसार बदल करून याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीला पाठविला जाणार आहे.

पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी यावर पर्याय शोधून त्यावर काम सुरू करा, म्हणून सांगितले होते. बैठकीस वाई येथील गुरव असोसिएटचे संदीप गुरव आणि महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबतसुद्धा उपस्थित होते. गुरव आणि सरनोबत यांनी हे काम आव्हान म्हणून स्वीकारले आणि अवघ्या पाच महिन्यांच्या अभ्यासानंतर शहरात पाच ठिकाणी उड्डाणपूल तर पाच ठिकाणी भुयारी मार्गांचे आराखडे तयार केले. सध्या आराखडे तयार झाले असले तरी अजून त्याच्या खर्चाची अंदाजपत्रके तयार केलेली नसून त्याचे काम सुरू झाले आहे.वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदतशहरातील अरूंद रस्ते, वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न आणि त्यातून पुढे सरकणारी वाहतूक हा शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावर आजपर्यंत केवळ पोलीस खात्यानेच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास महानगरपालिका प्रशासन अथवा राज्य शासन यांची म्हणावी तितकी साथ मिळाली नाही.परंतु आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पुढाकार घेतला असून, त्यांनी नवीन वर्षात शहरातील उड्डाणपूल व भुयारी मार्गांना मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून दिल्यास पुढील पन्नास वर्षांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. स्वत: पालकमंत्रीच या प्रकल्पाकरिता आग्रही असल्याने काही तरी चांगले घडेल, अशी अपेक्षा आहे.शहरातील नियोजित उड्डाणपूलरस्त्याचे नाव लांबी रुंदी प्रकारदाभोळकर चौक ते जनता बझार चौक ९५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गदाभोळकर चौक ते दसरा चौक २००० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गजोतिबा हॉटेल चौक ते कावळा नाका चौक २००० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गटाऊन हॉल ते जयंती नाला ७०० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गपापाची तिकटी ते रंकाळा टॉवर चौक २००० मीटर ८ मीटर एकेरी मार्गरस्त्याचे नाव लांबी रुंदी प्रकारसासने मैदान ते दाभोळकर कॉर्नर १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गखासबाग मैदान चौक १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गपद्माराजे गर्ल्स हायस्कू ल चौक १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गबी. टी. कॉलेज चौक शाहूपुरी १५० मीटर ४ मीटर एकेरी मार्गविरोधाची भूमिका नकोचकोल्हापूर शहरात काही नवीन करायचे म्हटले की त्यास विरोध झालाच म्हणून समजा; तसा पूर्वानुभव अनेक कामात आलेला आहे. त्यामुळे या कामात तरी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. प्रकल्प काय आहे, रस्ते कसे होणार आहेत याची माहिती घेऊन अभ्यास करूनच मग त्यावर आपले काही म्हणणे असल्यास सादर करणे अपेक्षित आहे. अगदी सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका घेणे सोयीचे होणार नाही, आणि येणारा काळसुद्धा माफ करणार नाही. त्यामुळे चर्चा, संवाद आणि सामंजस्याची भूमिकाच हिताची ठरणार आहे.दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक या मार्गावर उड्डाणपूल झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा भार बºयाच प्रमाणात हलका होणार आहे, तसेच स्टेशन रोडवरील वाहतूक कमी होईल, शिवाय पादचाºयांची रेल्वे लाईन ओलांडताना होणारी जीवघेणी कसरतही कायमची बंद होणार आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याने आणि रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे एकाच वेळी सगळी कामे करता येणे अशक्य आहे; म्हणून निधी मिळेल तशी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक कामाचे आराखडे, खर्चाची अंदाजपत्रके स्वतंत्रपणे केली जात आहेत.भास्करराव जाधव पुतळा (पाच बंगला) १५० मीटर ४ मीटर एकेरी मार्ग