शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पदवीचे पहिल्या वर्षीचे प्रवेश रखडणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

शिवाजी विद्यापीठ : संलग्नीकरण प्रमाणपत्रे महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत

सुहास जाधव -पेठवडगाव -शिवाजी विद्यापीठाने संलग्नीकरण प्रमाणपत्र महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाच्या माहिती पुस्तकांची अद्यापही छपाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पदवीच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना बसण्याची चिन्हे आहेत. बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाची माहिती पुस्तिका घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. या माहिती पुस्तिकेमध्ये विद्यापीठाच्या संबंधित महाविद्यालयास परवानगी दिलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र छापल्याशिवाय ते वितरित करू नये, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने दिली आहे.शिवाजी विद्यापीठाने एखादी सूचना केली की, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यंदा विविध अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण प्रमाणपत्र विद्यापीठाने न दिल्यामुळे महाविद्यालयांनी माहिती पुस्तकांची छपाई केलेली नाही. पदवीची प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी साधारणत: आठ दिवसांचा कालावधी असतो. तर महाविद्यालये १५ जूनला सुरू करावीत, असेही निर्देश विद्यापीठाचे आहेत. हे संलग्नीकरण प्रमाणपत्र शुक्रवारी (दि. ५ ) मिळणार असल्याचे समजते. त्यानंतर महाविद्यालये अशा प्रमाणपत्रासह माहिती पुस्तिका छपाईला देणार. त्यानंतर माहिती पुस्तिका वितरित होणार. नंतर महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवणार. या साऱ्यात बराच वेळ जाणार असल्याने महाविद्यालये १५ जूनपर्यंत सुरू होतील, याची शक्यता दिसत नाही. याबाबत विद्यापीठाच्या संलग्नीकरण विभागाशी संपर्क साधला असता, सगळ्याच महाविद्यालयांची कामे तत्काळ करण्यासाठी आग्रही असतात. मात्र, आम्हाला इतरही कामे असतात, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.शिवाजी विद्यापीठाकडून अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयांचे माहिती पत्रक, छपाई, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी, त्यानंतर प्रवेश ही सर्व प्रक्रिया लांबणार आहे. - भगवान सोनद, सचिव, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटना.विद्यार्थ्यांच्या माहिती संकलनाचे कामसध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुस्तके देण्याऐवजी विद्यार्थ्यांचे नाव, मिळालेले गुण, मोबाईल क्रमांक घेऊन पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना माहिती पुस्तकाअभावी महाविद्यालयाचे अंतरंग समजू शकत नाहीत. नुसतीच सर्व ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे दिसून येते.