शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पहिली कुस्ती बरोबरीत, शौकीन नाराज

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

कोकरूड मैदान : दुसरी कुस्ती डफळेने जिंकली

कोकरुड : ‘हिंदकेसरी’ सुनील साळुंखे विरुद्ध ‘महाराष्ट्र केसरी’ समाधान घोडके यांची ३८ मिनिटे सुरू असणारी कुस्ती दीर्घकाळ रटाळ होत गेल्यामुळे पंचांनी प्रथम गुणांवर विजय न झाल्याने ती बरोबरीत सोडविली. तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कौतुक डफळे याने विजय गुटाळवर सहाव्या मिनिटानंतर झोळी डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. तसेच किरण भगत याने आप्पा घुटे याच्यावर चौथ्या मिनिटाला समोरून दुहेरी पट काढून विजय मिळविला.कोकरुड येथे शुक्रवारी निनाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात सुमारे शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या पार पडल्या. मैदानाचे पूजन फत्तेसिंग देशमुख, उदयसिंग देशमुख, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.तृतीय क्रमांकाच्या लढतीत शिवाजी पाटील व पोपट घोडके, तसेच राजाराम यमगर व संदीप काळे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. चतुर्थ क्रमांकाच्या लढतीत विकास बंडगर याने रामदास पवारवर विजय प्राप्त केला.यावेळी विजयी झालेले मल्ल असे - गणेश माने, रविराज यादव, कृष्णा घोडे, सौरभ नांगरे, शुभम चव्हाण, संजय चव्हाण (कोकरुड), संजय जाधव (कोल्हापूर), कुमार पाटील (शित्तूर), अजय निकम (रेड), अक्षय पाटील (कोतोली), संदीप बंडगर (इस्लामपूर), नितीन ढेरे (पणुंब्रे), सुनील पाटील (बिळाशी), प्रताप पाटील (कोतोली), तानाजी भोई (माळेवाडी), प्रमोद पाटील (चिंचोली).या मैदानासाठी पंच म्हणून श्रीरंग नांगरे, दिनकर करूंगलेकर, संजय माने, भीमराव माने, संजय साळवी, निवास नांगरे, ज्ञानदेव घोडे, वसंत मोहिते, बाजीराव सनगर, रोहित घोडे, आनंदराव धुमाळ, संपतराव जाधव, बंडा पाटील यांनी काम पाहिले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव घोडे-पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील, विकासराव नांगरे, पोपट पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.