शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं पहिलं निमंत्रण रायगडाला...

By admin | Updated: May 2, 2017 23:59 IST

अनोखा पायंडा : बेलवडे बुद्रुकच्या नवरदेवाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नाचे निमंत्रण

संतोष गुरव ल्ल कऱ्हाडलग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदमय, अविस्मरणीय असा क्षण असतो. तो आणखी अविस्मरणीय राहील यासाठी प्रत्येकजण आपल्या कल्पक बुद्धीने तो साजरा करण्याचा प्रयत्न करतो. कोणी लग्न पत्रिकेवर शासनाच्या विविध योजनांची नावे टाकून योजनांचा प्रसार करतो. तर कोणी लग्नाचा खर्च गोरगरीब सामाजिक संस्थांना देतो. असा अनोखा पायंडा बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील नवरदेवानं पाडला आहे. येथील सचिन साळुंखे याने आपल्या लग्नाचं पहिलं निमंत्रण रायगडाला दिले आहे. लग्न ठरल्यानंतर पहिली लग्नपत्रिका ग्रामदेवाच्या चरणी ठेवून पत्रिका वाटपास प्रारंभ केला जातो. त्यानंतर पै-पाहुण्यांना पत्रिकेचे वाटप केले जाते. आपला विवाह अनोख्या पद्धतीने साजरा व्हावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशीच अनोखी इच्छा मनामध्ये करून बेलवडे बुद्रुक येथील सचिन साळुंखे या युवकाने आपल्या लग्नाची पहिली लग्न पत्रिका छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृतिस्थळी असणाऱ्या रायगडावर ठेवली आहे. यातून ‘आधी लगीनं कोंढान्याचं मग रायबाचं’ याची या नवरदेवाने आठवण करून दिली आहे.हटके पद्धतीने लग्न पत्रिका वाटपाचा निर्णय घेत सचिन यांनी आपले मित्र नंदकुमार मोहिते,प्रदीप माने, अतुल भोसले यांच्यासमवेत रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळावर लग्न पत्रिका ठेवली आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांच्या रायगडाला लग्नाचे निमंत्रण दिले. सचिन साळुंखे यांनी घेतलेल्या अनोख्या निर्णयाची गाव व परिसरातील तरुण वर्गामध्ये चांगलीच चर्चा होत आहे. अशा प्रकारे गडकोट, किल्ल्यांनाही लग्नाचं निमंत्रण देण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने लग्नपत्रिकासचिन साळुंखे यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने आपल्या लग्नाची पत्रिका प्रत्यक्ष गडकिल्ले यांना देण्याची हा पहिलीच वेळ आहे.