इचलकरंजी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी शनिवारपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील सुरक्षारक्षक विलास सिध्दाप्पा कांबळे यांना पहिली लस टोचण्यात आली.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोनाला हरविण्यात आपण सर्वजण यशस्वी ठरलो आहोत. त्याचा पुन्हा शिरकाव होऊ नये, यासाठी देशभरात लस उपलब्ध झाली असून, नियोजनबध्दपणे ती सर्वांना दिली जाणार आहे. याठिकाणी कोरोना काळात उपलब्ध आरोग्य सेवांमुळे चार हजारपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत, असे सांगितले. नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत शेट्ये, जिल्हा परिषदेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी शुभांगी रेंदाळकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, डॉ. विवेकानंद पाटील, डॉ. कुमार कदम, नरसिंह पारीक, डॉ. महेश महाडिक, डॉ. संदीप मिरजकर उपस्थित होते.
(फोटो ओळी)
इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेला शनिवारपासून सुरुवात झाली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, राहुल आवाडे, संजय केंगार, दीपक सुर्वे, डॉ. रविकांत शेट्ये, शुभांगी रेंदाळकर उपस्थित होते.