शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभादिनी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST

कोल्हापूर : दरवर्षी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत, उत्साही, आनंदी वातावरणामध्ये दीक्षांत समारंभ होतो. विद्यापीठ ...

कोल्हापूर : दरवर्षी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत, उत्साही, आनंदी वातावरणामध्ये दीक्षांत समारंभ होतो. विद्यापीठ कॅम्पस गर्दीने फुललेला असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाने पारंपरिक पध्दतीला छेद दिला. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. त्यामुळे दीक्षांत समारंभ असूनही मुख्य इमारत वगळता अन्य परिसरात शुकशुकाट पसरला होता. दीक्षांत विभागाकडून सर्व ७७,५४२ स्नातकांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे.

विद्यापीठात मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजता दीक्षांत मिरवणूक सुरू झाली. कुलगुरू कार्यालयापासून राजर्षी शाहू सभागृहामध्ये ही मिरवणूक आली. त्यामध्ये ‘ज्ञानदंड’ घेऊन परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे होते. यांसह कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि अन्य अधिकारी, अधिष्ठाता होते. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून समारंभ पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण शिववार्ता यु ट्युब वाहिनीवरून करण्यात आले. हा कार्यक्रम ६९०६ जणांनी पाहिला.

दरम्यान, दरवर्षी विद्यापीठातील शिवपुतळा परिसर, दीक्षांत समारंभ सभागृह, परीक्षा भवन, ग्रंथालय परिसर आदी ठिकाणे विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून जातात. पण कोरोनाची धास्ती आणि ऑनलाईन समारंभामुळे मंगळवारी या परिसरात शुकशुकाट पसरला होता.

चौकट

गौरवशाली विद्यापीठ

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरीय संशोधनात सक्रिय असलेले शिवाजी विद्यापीठ गौरवशाली आहे, असे प्रा. सहस्त्रबुध्दे यांनी कौतुक केले. ‘नॅक’चे ए-प्लस प्लस मानांकन मिळवून विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिध्द केल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केले.

फोटो (०६०४२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ दीक्षांत ०४,०५,०६, ०७) :

दरवर्षी दीक्षांत समारंभादिनी शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस गर्दीने फुलून जातो. यावर्षी मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने झाला. त्यामुळे विद्यापीठ परिसरात शुकशुकाट दिसून आला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०६०४२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ दीक्षांत ०८) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने झाला. त्याचे विद्यापीठाकडून थेट प्रेक्षपण करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)