शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव कारखान्यासाठी पहिल्या निविदेची खरेदी

By admin | Updated: June 7, 2015 00:34 IST

अटी शिथिल करा : श्रीराज डेव्हलपर्सचे राज्य बँकेस पत्र

भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवावयास घेण्यासाठी श्रीराज डेव्हलपर्स मुंबई या संस्थेने शनिवारी राज्य बॅँकेकडून पहिलीच निविदा खरेदी केली आहे. मात्र वस्तुस्थितीचा विचार करता, निविदेतील अटी व शर्तींबाबत कायदा व व्यवहाराची सांगड घालून काही अटी राज्य बॅँकेने शिथिल करण्याची मागणी श्रीराज डेव्हलपर्सच्या व्यवस्थापनाने लेखी पत्राद्वारे केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत १२ जून असून १५ जून रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. श्रीराज डेव्हलपर्सचे मालक प्रमोद पाटील यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील राजापूर हे आहे. मुंबईत बांधकाम व्यवसाय करणारे प्रमोद पाटील हे तासगाव कारखान्याचे सभासद व स्वातंत्र्यसैनिक गोविंददादा बाबूराव पाटील यांचे नातू आहेत. तासगाव कारखाना हा सभासदांच्या मालकीचा राहावा, या हेतूने त्यांनी कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली आहे. तरीही निविदेतील काही अटी रद्द करण्यासाठी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे उपस्थित केले आहेत. कारखान्यावरील ताबा सोडताना गणपती जिल्हा संघाने यंत्रे हलविली आहेत. त्या अद्यापही पूर्ववत करून दिलेली नाहीत. ती राज्य बॅँकेने पूर्ववत करून द्यावी. गेल्या दोन हंगामापासून कारखाना बंद असल्याने मोठ्या प्रमाणात यंत्रांची रिपेअरी व मेन्टेनन्सची कामे करावी लागणार आहेत. त्यास मोठा खर्च करावा लागणार आहे. जुन्या यंत्रांची गाळप क्षमता २२०० ते २३०० मेट्रिक टनापर्यंतच राहणार आहे. राज्य बॅँकेकडून एका गळीत हंगामासाठी साडेसहा कोटी रूपये अपेक्षित भाडे निर्धारित केले आहे. या बाबीचा फेरविचार करुन रिपेअरी व मेन्टेनन्ससाठी येणारा खर्च हा मूळ भाडे रकमेतून वजा करण्यात यावा. आजवर तासगाव कारखान्यात कधीच चार लाख टनाचे गाळप झालेले नाही. त्यामुळे कारखाना चालू झाल्यानंतर प्रत्यक्ष होणाऱ्या गाळपावर प्रति टनास १०० रुपयाप्रमाणे भाडे आकारावे. अशा मागण्यांचे पत्र त्यांनी राज्य बॅँकेला सादर केले. (वार्ताहर)