शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ पुण्यात

By admin | Updated: July 27, 2016 00:33 IST

नंदकुमार निकम : सप्टेंबरमध्ये परिषद, हजार शिक्षकांची नोंदणी

कोल्हापूर : शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्न्मेंटने पहिली नॅशनल टीचर्स काँग्रेस (एनटीसी) परिषद आयोजित केली आहे. पुणे येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात दि. २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान ही परिषद होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १००० शिक्षकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष निकम म्हणाले, राज्य शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशन, भारतीय छात्र संसद फाउंडेशन, विश्वशांती केंद्र, युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘एनटीसी’ होणार आहे. यात देशातील पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सुमारे आठ हजार शिक्षक सहभागी होतील. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड हे ‘एनटीसी’चे मुख्य समन्वयक आहेत. या पत्रकार परिषदेस माईर्स आर्टस, कॉमर्स अ‍ॅँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी. एन. मोरे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. कुचेकर, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, केएमसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश गवळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना आमंत्रण‘एनटीसी’मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्य:स्थिती आणि भवितव्य, सध्याच्या शिक्षणपद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?, कॉर्पोरेटसाठी सीएसआर तसेच शिक्षणासाठी टीएसआर, आपण शिकवितो; ते शिकतात का?, आदी विषयांवर चर्चा होईल. यासाठी शैक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, आदी क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. यातील सहभागासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.