शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

आधी मूर्तीवर नागचिन्ह घडवा

By admin | Updated: June 15, 2016 00:01 IST

शरद तांबट : देवीचे मूळ स्वरूप बदलून विकासाला अर्थ नाही

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्याआधी देवीची अपूर्ण मूर्ती पूर्ण केली पाहिजे. आॅगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेत मूर्तीवर नागचिन्ह घडवायचे राहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका, निवेदने, आंदोलन होऊनदेखील या प्रश्नाकडे कानाडोळा केला गेलेला आहे. याबद्दलचा संताप आजही कोल्हापूरच्या भाविकांमध्ये असून त्याचा उद्रेक होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी. देवीचे मूळ स्वरूप बदलून केलेल्या विकासाला काहीच अर्थ नाही. कोट्यवधी रुपये खर्चून विकास आराखडा करण्यापूर्वी सर्वांत आधी नागचिन्ह घडविले जावे. परगावहून येणाऱ्या भक्तांपुढे प्रश्न असतो तो पार्किंगचा. ही व्यवस्था कपिलतीर्थ मार्केटमध्ये करता येईल. येथे मल्टीलेव्हल पार्किंग, देवस्थान समितीचे कार्यालय, पोलिस नियंत्रण कक्ष, बँक अशा सोयी निर्माण करता येतील. या इमारतीच्या टेरेसवर हेलिपॅड केल्यास व्ही.आय.पीं.ना थेट मंदिरापर्यंत जाता येईल. पोलिस व प्रशासनाची तारांबळ कमी होईल. कपिलतीर्थ मार्केट सरस्वती टॉकीज परिसरात हलविता येणे शक्य आहे. कावळा नाका ते गंगावेश या मार्गावर उड्डाणपूल केल्यास परस्थ भाविक कोणालाही न विचारता मंदिरापर्यंत पोहोचू शकतील. अंबाबाई मूर्तीसह मंदिराचे मूळ रूप कायम ठेवावे. त्याला तडा जाऊ देता कामा नये. मंदिरातील पाय भाजणाऱ्या फरशा काढून टाकल्या जाव्यात. मंदिराच्या परिसरात कोणकोणत्या ठिकाणी अन्य देवादिकांची मंदिरे आहेत, त्याची कल्पना भाविकाला यावी यासाठी नकाशारूपात माहिती द्यावी. मंदिरात २४ तास पिण्याच्या पाण्याची सोय असावी. मंदिराबाहेर प्रसाधनगृहाची व्यवस्था चांगल्या पद्धतीची असावी. - शरद तांबटसामाजिक कार्यकर्तेओंगळवाणे प्रदर्शन कोणत्याही दरवाजाने मंदिरात जा; प्रत्येक ठिकाणी आवळे, चिंचा विकणारे लोक, फेरीवाले बसून ओंगळवाणे प्रदर्शन करतात. त्यात भर चपलांची. प्रत्येक दरवाजाबाहेर भला मोठा चपलांचा ढीग लागलेला असतो. इतस्तत: विखुरलेल्या चपला, कचराकुंडी, विक्रेते या सगळ्यांमुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. विक्रेत्यांना स्वतंत्र जागा देण्यात यावी आणि चप्पल स्टॅँडची योग्य सोय व्हायला हवी. यांचे प्रदर्शन मंदिराच्या दर्शनी भागात नकोच.