शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पहिला सरकारी पशुखाद्य कारखाना कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील पहिल्या सर्वांत मोठ्या शासकीय पशुखाद्य कारखान्याची कोल्हापुरात निर्मिती करणार असल्याची घोषणा दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी येथे केली. दुधाचे बिल महिलेच्या नावावर जमा करण्याचा कायदा करण्यात आला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.क्रशर चौक येथील केदारनाथ हॉल येथे राष्टÑीय ...

ठळक मुद्दे महादेव जानकर यांची घोषणा : ‘रासप’चा कार्यकर्ता मेळावाजिल्ह्यात पक्षाची स्थिती आता चांगली झाली असून, ग्रामीण भागात पक्ष वाढत अ व्हिजिटिंग कार्ड छापून शायनिंग मारण्यासाठी करू नका,

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील पहिल्या सर्वांत मोठ्या शासकीय पशुखाद्य कारखान्याची कोल्हापुरात निर्मिती करणार असल्याची घोषणा दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी येथे केली. दुधाचे बिल महिलेच्या नावावर जमा करण्याचा कायदा करण्यात आला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रशर चौक येथील केदारनाथ हॉल येथे राष्टÑीय समाज पक्षा (रासप)च्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, जिल्हा संपर्कप्रमुख मुकुंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. बाळासाहेब कामण्णा, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खोंद्रे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शुभांगी चितारी, जिल्हा युवक अध्यक्ष सागर साळोखे, आदींची होती.

मंत्री जानकर म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांमधील आपली स्थिती काय आहे? आपण किती जागा जिंकलो, याचे आत्मचिंतन केले पाहिजे. आतापर्यंत नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पक्षाचा चंचुप्रवेश होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. यामध्ये आपण कुठे तरी कमी पडलो हे लक्षात घेतले पाहिजे. आता नव्याने शून्यापासून तयारी करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना मजबूत करून ताकद वाढविण्यासाठी कामाला लागावे. हे करीत असताना आपल्याला झेपेल इतकेच काम हातात घ्या. पक्षाची ताकद वाढली तरच तुमची दखल घेतली जाईल, हे ध्यानात ठेवा.

ते पुढे म्हणाले, गाय, म्हैस, कोंबड्यांना चांगले व दर्जेदार खाद्य मिळावे, यासाठी राज्यातील पहिला शासकीय पशुखाद्य कारखाना कोल्हापुरात उभा करण्यात येणार आहे. दूध उत्पादक महिलेच्या नावावर दुधाचे बिल थेट जमा करण्याचा कायदा करण्यात आला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. ‘जलयुक्त शिवार’च्या धर्तीवर मस्त्यशेतीसाठी १४ हजार कोटींची नीलक्रांती योजना आणली आहे. यंदा पशुसंवर्धन खात्याचे ६ हजार ५०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येकी १० लाख युवक व युवतींना मत्स्योद्योगासाठी मदत होणार आहे.

डॉ. कचरे यांनी गेल्या दीड वर्षातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेत महापालिका निवडणुकीत १५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करून जिल्ह्णाच्या राजकारणात प्रवेश केल्याचे सांगितले. आगामी काळात ग्रामपंचायत व हुपरी नगरपालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.कामण्णा यांनी जिल्ह्यात पक्षाची स्थिती आता चांगली झाली असून, ग्रामीण भागात पक्ष वाढत असल्याचे सांगितले.

मुकुंद पाटील म्हणाले, ज्यांच्या घरात राजकीय पार्श्वभूमी नाही अशा कार्यकर्त्याला नेतृत्व देण्याचे काम या पक्षाने केले आहे. डॉ. एस. डी. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दीपाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. शिरोळ तालुकाध्यक्ष संजय वैद्य यांनी आभार मानले.अधिकाºयांकडे माहितीअधिकाराचा अर्ज टाकू नका‘रासप’च्या कुठल्याही कार्यकर्त्याने शासकीय अधिकाºयांकडे माहिती अधिकाराचा अर्ज टाकून त्यांना धमकावू नये, अशी विनंती करीत आतापर्यंत माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याने असा प्रकार केला नसल्याबद्दल मंत्री जानकर यांनी समाधान व्यक्त केले.लवकरच ‘पशुसंवर्धन’चे ‘अ‍ॅप’पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर हे स्वत: जागेवर भेट देऊन जनावरांची तपासणी करण्याऐवजी दुसºयाच कुणाला तरी पाठवितात. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टर प्रत्यक्ष जागेवर जातात का नाही? याची खातरजमा करण्यासाठी लवकरच ‘अ‍ॅप’ तयार करण्यात येणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. तसेच या खात्यातील डॉक्टरांच्या बदल्या पुढील वर्षीपासून आॅनलाईन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात २५ आमदारनिवडून आणण्याचे ध्येयआगामी काळात राज्यात पक्षाचे २५ आमदार व दोन खासदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी नुसते बोलून चालणार नाही, तर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे, असे मंत्री जानकर यांनी सांगितले.फुकटची पदे घेऊन त्यांचा वापर फक्त लेटरपॅड व व्हिजिटिंग कार्ड छापून शायनिंग मारण्यासाठी करू नका, एकवेळ पक्ष वाढला नाही तरी चालेल; पण असे काही करू नका, असेही त्यांनी सांगितले.