शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
3
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
4
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
5
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
6
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
7
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
8
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
9
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
10
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
11
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
12
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
13
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
14
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
15
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
16
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
17
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
18
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
19
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
20
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू

पहिल्या दिवशी ४७०० जणांनी दिली परीक्षा शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा सुरू;

By admin | Updated: May 5, 2017 23:06 IST

‘एम. एस्सी केमिस्ट्री’ला सर्वाधिक परीक्षार्थी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना शुक्रवारी सुरुवात झाली. त्यात पहिल्या दिवशी १८ अभ्यासक्रमांसाठी ४७८९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा दिली. त्यात सर्वाधिक ३४१८ परीक्षार्थी हे ‘एम. एस्सी केमिस्ट्री’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसले होते. एम. ए. अथवा एम. एस्सी. (भूगोल), मास कम्युनिकेशन, एम. एस्सी. (केमिस्ट्री), बी.जे.सी., एम.जे.सी., एम. एस्सी. अ‍ॅग्रो केमिकल्स अ‍ॅन्ड पेस्ट मॅनेजमेंट, एम. ए. भाषेच्या (विद्याशाखा बदल) अन्य शाखांच्या परीक्षा शुक्रवारी झाल्या. त्यासाठी ५४३३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली. त्यापैकी ४७८९ जणांनी परीक्षा दिली, तर ६४४ परीक्षार्थी गैरहजर होते. या परीक्षांसाठी विद्यापीठातील ग्रंथालय इमारत, मानव्यशास्त्र इमारत आणि रसायनशास्त्र विभाग आणि सायबर, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सांगलीतील वालचंद कॉलेज ही केंद्र होती. सकाळी साडेनऊ ते साडेदहा, सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा, दुपारी एक ते अडीच आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा सत्रांमध्ये परीक्षा झाली. त्यातील एम. एस्सी. केमिस्ट्री अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ३७३६ जणांनी नोंदणी केली होती. त्यातील ३४१८ जणांनी परीक्षा दिली, तर ३१८ अनुपस्थित राहिले. अन्य अभ्यासक्रमांच्या तुलनेत या परीक्षेसाठी सर्वाधिक परीक्षार्थी होते. या परीक्षांमुळे विद्यापीठ आणि परीक्षा केंद्रांचा परिसर गर्दीने फुलला होता. दरम्यान, यावर्षी विविध अभ्याक्रमांच्या ३९ परीक्षा होणार आहेत. त्याची सुरुवात आजपासून झाली. पहिल्या दिवशीचा परीक्षा सुरळीत पार पडल्या असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ................................................................. प्रवेशपत्रावर बैठक क्रमांक नसल्याने गोंधळ काही परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर बैठक क्रमांकाची छपाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. त्याची माहिती मिळताच परीक्षा विभागाने ‘नेमलिस्ट समरी’द्वारे बैठक क्रमांक उपलब्ध करून दिले. ............................................................... आज होणाऱ्या परीक्षा बी. लिब. सायन्स अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब. सायन्स अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रो बायॉलॉजी, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मायक्रो बायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अ‍ॅन्ड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्स, एम. एस्सी. अ‍ॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अ‍ॅन्ड इन्फर्मेटिक्स या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने आज, शनिवारी होतील. ....................................................................... (संतोष मिठारी)