शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

तेजश्री चौगले : घरची जबाबदारी सांभाळून दररोज सात ते आठ तास अभ्यास

कोल्हापूर : बारावी सायन्सनंतर डी. एड्. आणि बी. ए. करून स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या माजगांव (ता. राधानगरी) येथील तेजश्री चौगले हिने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे.तेजश्री हिचे शालेय शिक्षण माहेर असलेल्या मारडी (जि. सातारा) येथे झाले. दहिवडी कॉलेजमध्ये तिने बारावी (विज्ञान) पूर्ण केली. त्यानंतर डी. एड्. आणि बी.ए.ची पदवी मिळविली. शिक्षण सुरू असतानाच तिचा विवाह झाला. येळवडे (ता. राधानगरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तिचे पती विनायक यांनी तिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गेल्यावर्षीपासून तिने अभ्यास सुरू केला. विनायक हे स्वत: देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यांच्या आणि कोल्हापुरातील एन. पी. स्पर्धा परीक्षा केंद्राचे नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परीक्षेची तयारी करताना तिने पीएसआयचे ध्येय बाळगले. त्यानुसार दिवसातील सात ते आठ तास अभ्यास केला. त्याच्या जोरावर तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. (प्रतिनिधी)हॉस्पिटलमध्ये आनंदोत्सव...तेजश्रीचे पती विनायक काल, मंगळवारपासून कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तेजश्रीचे यश समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिचे सासरे विश्वास चौगले, नणंद रुपाली नलवडे, दाजी संग्राम नलवडे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन तेजश्री आणि तिचे मार्गदर्शक नितीन पाटील यांना पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तेजश्रीच्या यशाबाबत विनायक म्हणाले, दोन वर्षांची मुलगी आणि घरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून तिने यश मिळविले आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याचा खूप आनंद झाला.