शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फिरंगोजी शिंदे यांच्या स्मृतिदिनी मशाल दौड

By admin | Updated: December 6, 2015 01:35 IST

भवानी मंडप येथून सुरुवात : संभाजी ब्रिगेड, गिरगाव ग्रामस्थ व इतिहासप्रेमी यांच्यावतीने आयोजन

कोल्हापूर : ‘क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे अमर रहे, अमर रहे,’अशा घोषणा देत येथील क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिज्योत मशाल दौड येथील भवानी मंडप येथून शनिवारी काढण्यात आली. सकाळी आनंदसिंह शितोळे -देशमुख यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या क्रांतिज्योत मशालीचे उदघाटन झाले. त्यानंतर ही क्रांतिज्योत मशाल दौड शहरातील विविध भागांत फिरून शिंदे यांच्या गिरगाव (ता. करवीर) या मूळ गावाकडे रवाना झाली. पाच डिसेंबर १८५७ ला भवानी मंडप येथे झालेल्या लढ्यातील शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी या क्रांतिज्योत मशाल दौडीचे आयोजन संभाजी ब्रिगेड, गिरगाव ग्रामस्थ व इतिहासप्रेमी यांच्यावतीने करण्यात आले होते. भवानीमंडप येथून क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्या क्रांतिज्योत मशाल दौडला सुरुवात झाल्यानंतर ही दौड शिवाजी चौकात आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बिंदू चौक, मिरजकर तिकटी, संभाजीनगर, पाचगाव मार्गे गिरगावकडेरवाना झाली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रूपेश पाटील म्हणाले, गिरगाव येथे शनिवारी रात्री फिरंगोजी शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी ५०० दिवे लावून दीपोत्सव साजरा करणार आहे. या दौडमध्ये शिवाजी गुरव, संभाजी पाटील, सर्जेराव कोंडेकर, ओंकार पाटील, ऋषिकेश पाटील, उमेश पोवार, संकेत साळोखे, बंडू कुरणे, संभाजी साळोखे, प्रवीण पाटील, संदीप मेढे यांच्यासह गिरगावचे ग्रामस्थ, इतिहासप्रेमींचा सहभाग होता. फिरंगोजी शिंदे यांचा हौतात्म्य दिन... गिरगाव (ता. करवीर) येथे क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्या गावी शनिवारी इतिहास प्रेमींच्यावतीने हौतात्म्य दिन साजरा केला. शिंदे यांच्या स्मारकाजवळ मशाली व पणतीच्या उजेडात पुष्पचक्र वाहून हौतात्म्य दिन साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, हिल रायडर्स अ‍ॅण्ड हायकर्स गु्रपचे प्रमोद पाटील, मैत्रेय प्रतिष्ठानचे डॉ. अमर आडके, समीर अ‍ॅडव्हेंचरचे विनोद कांबोज, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, विराज पाटील, प्रसाद आडनाईक, सरपंच संध्या पाटील, उपसरपंच यांच्यासह चंदन मिरजकर, सूरज ढोली, स्नेहल रेळेकर, पी. जी. जाधव, राणोजी पाटील, महेश नलवडे, आदी उपस्थित होते.