शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाकडून कमकुवत महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ

By admin | Updated: February 12, 2016 00:59 IST

५२ व्या दीक्षांत समारंभात पदवी, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस मान्य

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील शिवाजी विद्यापीठ संलग्नित कमकुवत महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ देण्यास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी मान्यता दिली.विद्यापीठाच्या कार्यालयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन आणि विद्या परिषदेची बैठक झाली. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सन २०१५-१६ मध्ये विद्यापीठ संलग्नित कमकुवत महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यासाठी छाननी समितीने केलेल्या शिफारशी मान्य करण्यात आल्या. ५२ व्या दीक्षांत समारंभात पदवी, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस मान्य करण्यात आली.विद्यापीठाचा सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील मराठी आवृत्तीतील ५२ वा वार्षिक अहवाल, तसेच विद्यापीठाचे सन २०१५-१६चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे वार्षिक अंदाजपत्रक व मूल्यमापन अहवाल दुरुस्तीसह मान्य करण्याबाबत अधिसभेस शिफारस करण्यात आली. त्यासह विद्यापीठातील संगणकशास्त्र विभाग व पुण्यातील सी-डॅक, विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि शासकीय तंत्रनिकेतनची धातुतंत्र प्रबोधिनी, तसेच नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच विद्यापीठ आणि येउंगनाम युनिव्हर्सिटी (रिपब्लिक आॅफ कोरिया) यांच्यात करार करण्यास मान्यता दिली. (प्रतिनिधी)‘बहाई अकॅडमी’ मान्यताप्राप्त परिसंस्था विद्या परिषदेच्या बैठकीत पाचगणीमधील ‘बहाई अकॅडमी’ या संस्थेला मान्यताप्राप्त परिसंस्था म्हणून मान्यता देण्यात आली. विद्यापीठाला विविध महाविद्यालयांकडून त्यांच्या महाविद्यालयात अभ्यासक्रम बंद करण्याबाबत अथवा प्रवेश क्षमता घट करण्याबाबत आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाची व्यवस्थापन परिषदेला शिफारस करण्यात आली.