शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर परतीच्या पावसाने दिलासा

By admin | Updated: September 10, 2015 00:48 IST

सर्वत्र कमालीचा गारवा : दमदार हजेरीने बळिराजा सुखावला; शहरात फेरीवाल्यांची तारांबळ

कोल्हापूर : गेले महिनाभर चातकासारखी वाट पाहायला लावल्यानंतर बुधवारी दुपारनंतर पावसाने सगळ््यांनाच थंडगार करून टाकले. महिन्याचा उन्हाळा व एका दिवसाचा पावसाळा याचीच अनुभूती पावसाने आणून दिली. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी दिवसभर परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले भरून वाहिले. बळिराजासह उकाड्याने हैराण झालेले लोक सुखावले. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. शहरातील फेरीवाले, पादचारी, दुचाकीस्वार यांची तारांबळ उडाली. गेली दोन दिवस उष्म्याने भाजून काढले होते. त्यामुळे कधी एकदा पाऊस येतो अशी आस सगळ््यांनाच लागून राहिली होती. सकाळी तसे वातावरण तयार झाले. पावसाची चाहूल लागली; परंतु परत सूर्य तापू लागला. दुपारी साडेबाराच्या सुमारास आकाशाचा नूर पालटला. काळ््या ढगांची गर्दी झाली. आणि बघता बघता पावसाची सर आली. दोन महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस नाही. केवळ आकाशात ढगांची गर्दी होत होती. मात्र, पावसाला जोर नव्हता. यामुळे ऐन पोसवण्याच्या अवस्थेत असलेली पिके धोक्यात आली. पावसाने तीन आठवडे पूर्णपणे पाठ फिरविली. सकाळी आणि रात्री थंडी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन असे वातावरण राहिले. सप्टेंबर महिना असूनही त्यात ‘आॅक्टोबर हीट’ जाणवत होती. भरवशाची सर्व नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे बळिराजाने जोरदार पावसाची आशा सोडली होती. वाळत असलेली पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणचा शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देत आहे. दरम्यान, पुष्य नक्षत्र सुरू झाल्यामुळे वातावरणात बदल झाला. दोन महिने गायब दोन महिन्यांपासून शहर, परिसर, जिल्हा येथून संततधार पाऊस गायब झाला होता. गगनबावडा, राधानगरी, चंदगड या तालुक्यांत एक ते सहा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला. १ सप्टेंबरनंतर जिल्ह्यात एक थेंबही पाऊस पडला नाही. त्यामुळे हे पावसाळ्याचे दिवस आहेत, हेच सारेजण विसरून गेले होते.