शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...अखेर माउलींचा मार्ग झाला खुला !

By admin | Updated: July 12, 2015 00:36 IST

लोणंदला आढावा बैठक : प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविली

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर माउलींचे जिल्ह्यात स्वागत केल्यापासून ते पालखी तळापर्यंतच्या मार्गात अनेक व्यावसायिकांनी टपऱ्या टाकून अतिक्रमण केले होते, तसेच राजकीय नेत्यांनी वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावले होते. त्यामुळे वारकऱ्यांना अडथळे ठरत होते. अतिक्रमणे शनिवारी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत ही शंभरहून अधिक अतिक्रमणे, अडथळे हटविली. आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा गुरुवारी (दि. १६) लोणंदनगरीत विसावत आहे. माउलींचे स्वागत व नीरा नदीत स्नान गुरुवारी दुपारी होणार आहे. नीरास्नान केल्यानंतर वारकरी लोणंदनगरीत मुक्कामी येत असतात. माउलींच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून भाविक येत असतात. या गर्दीचा लाभ घेण्यासाठी काहींनी गेल्या वर्षी रस्त्याच्या कडेला जीवनाश्यक वस्तूंची छोटी दुकाने टाकली होती. ती तशीच उभी आहेत. तसेच स्थानिक राजकीय नेतेमंडळी वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावून स्वत:ला मिरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अतिक्रमणामुळे वारकऱ्यांना मार्गक्रमण करणे अडचणीचे ठरते. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथे शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर म्हणाले, ‘वारकऱ्यांचे स्वागत त्यांचा पाहुणचार करून करावे, त्यांच्या स्वागताचे फलक लावून अडचणी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पालखी मार्गातील अतिक्रमणे काढली आहेत, ती पुन्हा होणार नाहीत, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. पालखीतळावर पाण्याचे टँकर व चोवीस तास पाण्याची सोय करावी, आरोग्य विभागाने औषधांचा साठा, रुग्णवाहिका, डॉक्टरांची पथके तयार ठेवावीत. आपत्कालीन यंत्रणा राबवून सर्वांनीच प्रामाणिकपणे कामे करावीत.’ यावेळी तहसीलदार शिवाजी तळपे, गटविकास अधिकारी विलास साबळे, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता संजय भोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य आनंदराव शेळके-पाटील, बांधकाम उपअभियंता युवराज देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच स्नेहलता शेळके-पाटील, सदस्य शिवाजीराव शेळके, दादासाहेब ठोंबरे, शंकर क्षीरसागर, प्रदीप क्षीरसागर, ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर, बाळासाहेब भिसे, गजेंद्र मुसळे उपस्थित होते. (वार्ताहर)