शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम दर हिशोबात कारखानदारांची मखलाशी

By admin | Updated: June 10, 2017 17:47 IST

‘अंकुश’चा आरोप : बगॅस विक्रीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळावी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १0 : ऊस दर नियंत्रण समितीपुढे आर्थिक वर्षातील हिशोब ठेवताना साखर कारखानदार मखलाशी करीत असून, त्यातूनही शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. यावर्षी चुकीचा हिशोब देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ऊस दर नियंत्रण समितीकडे करणार असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

रंगराजन समितीच्या शिफारसीप्रमाणे उसाचा अंतिम दर निश्चित केला जातो. एकूण उत्पन्नातील ७० टक्केवाटा शेतकऱ्यांना, तर ३० टक्के कारखाना प्रशासनासाठी वापरला जातो; पण रंगराजन यांनी शिफारस करताना सरासरी १०.३० टक्केउतारा गृहित धरून हा फॉर्मुला निश्चित केला आहे. कोल्हापूर विभागाचा विचार करायचा झाल्यास सरासरी १२.६० टक्के उतारा असल्याने येथे कारखानदारांनी ८०:२० फॉर्मुल्यानुसार शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण बगॅसची रक्कम देणे बंधनकारक आहे. मागील वर्षाचे ऊस दर नियंत्रण समितीला दिलेले हिशोब चुकीचे होते. साखर व मळीवरील अबकारी कर शेतकऱ्यांच्या हिश्श्यातून वसूल केला आहे. काही कारखाने अंदाजे आकडेवारी देऊन समितीबरोबरच शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, अशी फसगत यावर्षी कोणी केली तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ऊस दर नियंत्रण समितीकडे करणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

कारखान्यांच्या माहितीमध्ये त्रुटी

साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे महसुली उत्पन्नाच्या आधारे ऊस दर निश्चित करण्यासाठी सादर केलेल्या माहितीत अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. अचूक माहिती कार्यालयास सादर करण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

साखर आयुक्तांच्या परिपत्रकानुसार टनाचा हिशोब -

साखर-सरासरी १२.६० टक्के उतारा व प्रतिक्विंटल ३५०० रुपये दरानुसार = ४४१० रुपयेमळी - टनाला ४० किलो व दर प्रतिकिलो ६ रुपये = २४० रुपये बगॅस - वीज प्रकल्प असलेल्या कारखान्यांचे उत्पन्न = ११२ रुपये प्रेसमढ - टनाला ४० किलो प्रेसमढ व दर ४०० रुपये प्रतिटन = १६ रुपयेटनापासून एकूण उत्पन्न = ४७७८पैकी ७० टक्केशेतकऱ्यांचा वाटा = ३३४४ रुपये ऊस तोडणी-वाहतूक = ६०० रुपये अंतिम दर - २७४४ रुपये