शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
3
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
4
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
5
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
6
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
7
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
8
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
9
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
10
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
11
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
12
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
14
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
15
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
16
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
17
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
18
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
19
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
20
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

नेसरीची विहीर मोजतेय अंतिम घटका

By admin | Updated: May 3, 2014 16:59 IST

एकेकाळी नेसरीच्या निम्म्या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर स्थानिक पुढार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंतिम घटका मोजत आहे.

नेसरी : एकेकाळी नेसरीच्या निम्म्या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर स्थानिक पुढार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंतिम घटका मोजत आहे.नेसरीची प्रथम नळपाणी पुरवठा योजना झाली ती १९८० च्या दशकात. मात्र, त्याआधी व नंतरसुद्धा याच मदारशा विहिरीनं नेसरीची तहान भागविण्याबरोबरच धुणी धुण्याची सोय करून दिली. गावात ३०-३५ वर्षांपूर्वी प्रत्येक समाजासाठी विहिरी होत्या. मदारशा विहिरीवर मात्र सर्व जाती-धर्मांचे लोक पाणी भरत. घरी वापरण्यासाठी याच पाण्याचा उपयोग होत होता. कपडे धुण्यासाठी तर या विहिरीवर नेहमी गर्दी असायची.मात्र, कालांतराने या विहिरीकडे दुर्लक्ष व्हायला लागले. प्रत्येकाच्या घरी नळ आल्याने व घटप्रभा नदीचे पाणी घरोघरी पोहोचू लागल्याने या विहिरीचा एक एक रहाट कोसळू लागला. पक्क्या दगडी बांधकामाची विहीर केव्हा जमीनदोस्त झाली, हे कळायला व समजून घ्यायला स्थानिक पुढार्‍यांना फुरसतही मिळाली नाही. त्यामुळे एकेकाळी मोठ्या दिमाखाने उभी राहिलेली व नेसरीच्या वैभवात भर घालणारी ही विहीर आता भकास झाली आहे. त्याचे सर्व कठडे विहिरीत कोसळले आहेत. मोठमोठे दगड विहिरीत बघताना प्रत्येक बुजुर्गाच्या मनात व समोर उभी राहते ती पूर्वीची मदारशा विहीर.विहिरीवर तीन रहाट होते. त्याचा आवाज केव्हाच थांबला. आता फक्त उरल्या आहेत आठवणी. शासन व स्थानिक पुढार्‍यांनी वास्तवीक या नेसरीच्या ठेव्याकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. (वार्ताहर)