शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात हॉलिवूडपटाचे चित्रीकरण

By admin | Updated: January 26, 2017 00:48 IST

कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायासाठी सकारात्मक बाब

कोल्हापूर : मराठी, हिंदी चित्रपटानंतर आता हॉलिवूडलादेखील कोल्हापुरातील लोकेशन्सची भुरळ पडली आहे. अमेरिकेतील ‘रिमेंम्बरिंग अ‍ॅम्नेशिया’ या चित्रपटाचे चित्रीकरण बुधवारपासून सुरू झाले आहे. यानिमित्ताने कोल्हापुरात प्रथमच हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला जशी निसर्गाची देणगी लाभली आहे तसेच येथील पुरातन वास्तू जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे शिवाय येथील मातीतच चित्रपटसृष्टीची बिजे रुजली आहे. येथे मराठी, हिंदी चित्रपटांचे मालिकांचे चित्रीकरण होत असते. मात्र, हॉलिवूडपटातही येथील लोकेशन्स चमकणार आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेले निर्माते, दिग्दर्शक डॉ. रवींद्र गोडसे आणि ठकार प्रॉडक्शनच्यावतीने ‘रिमेंम्बरींग अ‍ॅम्नेशिया’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातील विविध लोकेशन्सवर होत आहे. या चित्रपटाच्या टीमसाठी महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसचे आनंद काळे, सर्जेराव पाटील आणि मिलिंद अष्टेकर गेल्या आठ महिन्यांपासून प्रयत्नात होते. त्यांनी मेलद्वारे मेरी वॉनलेस दवाखाना, रेल्वे स्टेशनसह विविध लोकेशन्सची छायाचित्रे चित्रपटाच्या टीमला पाठवली. त्यांना ही लोकेशन्स आवडल्यानंतर ही टीम मंगळवारी शहरात दाखल झाली. रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. कथानकातील अभिनेता काही दिवसांसाठी भारतात येतो आणि येथे त्याला आलेले अनुभव हा भाग कोल्हापूरसह गोव्यात चित्रीत करण्यात येत आहे. मूळचे भारतीय असलेले दिलीप राव या अभिनेत्याची यात मध्यवर्ती भूमिका आहे. त्यात हॉलिवूड कलाकारांसह अभिनेते महेश मांजरेकर, मेघा मांजरेकर, श्रृती मराठे, आनंद काळे, जयवंत वाडकर, विजय पाटकर, डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जीम लुडॉक्स हे मुख्य कॅमेरामन आहेत. ३१ तारखेपर्यंत चित्रीकरण चालणार आहे. नवी सुरुवात कोल्हापूर चित्रनगरी आता आकाराला येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हॉलिवूडपटाचे चित्रीकरण ही कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायासाठी सकारात्मक बाब असणार आहे. एका चित्रपटामुळे कलाकारांसह जवळपास शंभर जणांना रोजगार मिळतो. या चित्रपटासाठी तंत्रज्ञ, स्पॉटबॉय अशा पडद्यामागील ७५ जणांना काम मिळाले आहे.