शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

चित्रपट महामंडळातील वाद पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:01 IST

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणातून अभिनेत्री छाया सांगावकर यांनी नोंद केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून चित्रपट महामंडळाचे ...

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणातून अभिनेत्री छाया सांगावकर यांनी नोंद केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून चित्रपट महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांची निर्दोष मुक्तता झाली.या निकालानंतर सोमवारी महामंडळाच्या कार्यालयासमोर महामंडळाच्याच तिघा सदस्यांच्या निषेधाचा फलक काही कामगार व चित्रपट व्यावसायिकांनी लावला. सायंकाळी हा फलक विरोधी गटातील काहींनी जाळून टाकला. या प्रकरणातून महामंडळातील किळसवाण्या राजकारणाचेच प्रदर्शन शहरवासीयांना झाले.घडले ते असे : चित्रपट महामंडळाच्या अंतर्गत राजकारणातून ३० जुलै २०१४ ला अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याचा निकाल १४ आॅक्टोबरला जाहीर झाला व त्यामध्ये अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकालाची प्रत दोन दिवसांपूर्वी मिळाल्यावर रविवारी अ‍ॅड. प्रकाश मोरे व अष्टेकर यांनी पत्रकार परिषद घेवून निकालाची माहिती दिली. या घटनेविरोधात छाया सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात २५ लाख रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्याबरोबरच फौजदारी गुन्हाही नोंद केल्याचे सांगितले. महामंडळाची बदनामी करणाऱ्या या तिघांचेही सभासदत्व रद्द करावे, अशी त्यांनी मागणी केली. हा विषय येथेच थांबला नाही.सोमवारी सकाळी महामंडळाच्या खासबाग येथील कार्यालयाच्या दारातच या घटनेला कारणीभूत असलेल्या सांगावकर, नलवडे व पन्हाळकर या तिघांच्याही छायाचित्रासह निषेध करणारा फलक काही चित्रपट व्यावसायिक व कामगारांनी लावला. सांगावकर यांना पुन्हा सदस्य करून घेतल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष व कार्यकारिणीचाही निषेध असाही उल्लेख त्या फलकावर होता. महामंडळासमोरील रस्त्यावरून जाणाºया शहरवासियांत या फलकाची चांगलीच चर्चा झाली. ही बाब कळल्यानंतर विरोधातील चित्रपट व्यावसायिकांनी सायंकाळी हा फलक काढून पेट्रोल टाकून तिथेच जाळून टाकला. या साºया घडामोडीतून महामंडळातील टोकाच्या राजकीय संघर्षाचे दर्शन झाले.