शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

चित्रपट महामंडळ तीन वर्षांनी फायद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:50 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखरसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गंगाजळीत गेल्या ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखरसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गंगाजळीत गेल्या तीन वर्षांत कोटींची उड्डाणे झाली आहेत. नवी कार्यकारिणी निवडून आल्यापासून महामंडळाच्या ठेवी नऊ कोटींवर गेल्या असून, कोल्हापूर व पुणेयेथील कार्यालयांसाठी जागांच्या खरेदीतून महामंडळाची स्वत:ची स्थावर मालमत्ता तयार केलीआहे.तीन वर्षांपूर्वी महामंडळावर आलेल्या कार्यकारिणीच्या काळात महामंडळ आंदोलने, भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप आणि वादंगाने ढवळून निघाले. त्यातच महामंडळाच्या पैशांचा अनावश्यक वापर आणि मानाचा मुजरा कार्यक्रमामुळे महामंडळाची तिजोरी रिकामी झाली. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या कार्यकारिणीसमोर आव्हान होते ते महामंडळाचे कारभार सुधारण्याचे आणि खडखडाट झालेल्या तिजोरीत पुन्हा गंगाजळी तयार करण्याचे.या काळात राज्यातील गावोगावी मेळावे आणि बैठका घेऊन महामंडळाच्या कारभाराची माहिती आणि महत्त्व पटवून देण्यात आले. स्थानिक कलाकार, संस्था, संघटनांपेक्षा महामंडळ ही अधिकृत संघटना असून, तिचेच मत शासनदरबारी ग्राह्य धरले जाते हे पटवून देण्यात आले. मागील कार्यकारिणीच्या पाच वर्षांत तीन अध्यक्ष झाले होते; पण गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरच्या पातळीवरील वाद वगळता महामंडळाचे संचालक व कार्यकारिणीत स्थिरता आल्याचा फायदा झाला आहे.यापूर्वी कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणीच महामंडळाची कार्यालये होती. त्यानंतर नागपूर, औरंगाबाद, बीड, सांगली आणि सावंतवाडी या पाच शहरांमध्ये नव्या शाखा सुरू करण्यात आल्या. आता त्यात लघुपट निर्मिती, दूरचित्रवाणी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.महामंडळाच्या पैशांचा कमीत कमी वापर, कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्व, उत्पन्नवाढीचे प्रयत्न यामुळे तीन वर्षांत महामंडळाच्या तिजोरीत नऊ कोटींची भर पडली आहे.यातून कोल्हापूरच्या कॉर्पोरेट कार्यालयासाठी, पुणे कार्यालयासाठी जागा खरेदी करण्यात आली.तीन वर्षांत सभासद संख्या दुप्पटसभासद नोंदणी, प्रवेशशुल्क, नवीन चित्रपटाची नोंदणी, तक्रार निवारण, वार्षिक सभासद नोंदणी हे महामंडळाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. गेल्या तीन वर्षांत महामंडळाच्या सभासदांची संख्या १८-१९ हजारांवरून ३६ हजारांवर गेली आहे. नव्या मराठी चित्रपटाची नोंदणी, सेन्सॉरसाठी महामंडळाची एनओसी, शासकीय अनुदान व सरकारी योजनांचा लाभ या सगळ्यांसाठी चित्रपट महामंडळाचे शिफारस पत्र लागत असल्याने महामंडळाचे सभासद होण्याचे प्रमाण वाढले आहे.महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोतओळखपत्र : २० लाख १३ हजार ४००प्रवेश शुल्क : १ कोटी २ लाख ८५ हजार १००नूतन चित्रारंभ शुल्क : ८२ लाख ४२ हजार ०५०तक्रार निवारण शुल्क : १७ लाख ७ हजार ३९५चित्र शीर्षक नोंदणी : २० लाख १५ हजार ३०४वार्षिक सभासद नोंदणी : ७२ लाख १२ हजार २९९सभासद आगाऊ नोंदणी : २४ लाख १७ हजार ०५०प्रायोजकत्व : १४ लाख २५ हजार ५५०