शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांना पकडण्यासाठी जेल भरो; जिल्हाधिकाऱ्यांंच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 3, 2015 00:42 IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरण :

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सोमवारी भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडून त्यांना अडविताना चांगलीच पुरेवाट झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर पोलिसांची झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला. अखेर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही काळानंतर सुटका केली.पानसरे यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेले तरी मारेकऱ्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही. त्याच्या निषेधार्थ भाकपतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात सकाळी अकराच्या सुमारास बिंदू चौक येथून निषेध मोर्चाने झाली. दिलीप पवार, नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, मिलिंद यादव, गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘पानसरेंच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा’, ‘पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा धिक्कार असो’, ‘आम्ही सारे पानसरे’,‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा’ अशा घोषणा देत मोर्चा मार्ग दणाणून सोडला. आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी रघु कांबळे, सतिश कांबळे, मिलिंद यादव, गिरिश फोंडे,शिवाजी माळी आदींनी फाटकावर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी व महिलांनी गनिमी कावा करत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे धाव घेत आत जाण्याचा प्रयत्न केला. मिलिंद यादव यांना पोलिसांनी यावेळी फरपटत नेले. यावेळी झटापट होऊन तणाव निर्माण झाला.