शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भराव संबंधितांना काढायला लावणार

By admin | Updated: June 26, 2016 01:27 IST

मोती तलाव प्रकरण : नायब तहसीलदारांचे आश्वासन; देसार्इंचे आत्मक्लेश आंदोलन; तणाव

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथील शाहूकालीन मोती तलावात मुरूम, दगड टाकून तो बुजविण्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबत संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व हा भराव काढून टाकावा, या मागणीसाठी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी या तलावात तासभर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी हा भराव येत्या १५ दिवसांत संबंधितांना काढायला लावू, असे आश्वासन करवीरचे नायब तहसीलदार अविनाश निंंबाळकर यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेतले. या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल व समर्थक आल्याने आंदोलक व ग्रामस्थ आक्रमक झाले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. शाहूकालीन तलावात मुरूम, दगड टाकून तो मुजविण्याचा घाट घातला जात आहे. याच्या निषेधार्थ दिलीप देसाई यांच्यासह सचिन तोडकर, विश्वनाथ पोवार, कुमार कांबळे, दिलीप बोरगावकर, सोमाजी गायकवाड, आदींनी सकाळी अकराच्या सुमारास तलावातील पाण्यात बसून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. काही वेळातच करवीरचे नायब तहसीलदार अविनाश निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी त्यांना तलावात भराव टाकल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर प्रशासनाकडून पारस ओसवाल यांना यापूर्वी अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी २० लाखांचा दंड केला असल्याचे सांगून हा भरावही संबंधितांना १५ दिवसांत काढून घेण्यास सांगितला जाईल, असे आश्वासन निंबाळकर यांनी दिले. त्यानंतर देसाई यांच्यासह आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक ओसवाल हे कोल्हापूर कॉलिंगच्या कार्यकर्त्यंाना घेऊन तलावाच्या पश्चिम बाजूला थांबून होते. आंदोलन संपल्यावर ते आत तलावातून आंदोलकांच्या दिशेने येऊ लागले. यामुळे आंदोलक व ग्रामस्थ चांगलेच संतापले. हातात दगड घेऊन तीनशेहून अधिक जणांचा जमाव ओसवाल समर्थकांच्या दिशेने निघाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक जाधव यांनी आंदोलक व ग्रामस्थांना येथेच थांबण्याची विनंती केली; परंतु हा जमाव ऐकायला तयार नव्हता. आधी त्यांना येथून घालवा मगच आम्ही थांबतो, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांनी ओसवाल समर्थकांना तेथून हाकलल्यानंतरच हा जमाव शांत झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, क्षत्रिय मराठा चेंबर्सचे दिलीपराव पाटील, निवासराव साळोखे, अशोक पोवार, बाळासाहेब मुधोळकर, बुरहान नायकवडी, अवधूत पाटील, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)