शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी पंचायत समितीमध्ये उपसभापतिपदासाठी ‘फिल्ंिडग’

By admin | Updated: March 13, 2017 23:33 IST

निवडीबाबत उत्सुकता : राष्ट्रवादीकडे सभापतिपदाचा एकमेव सदस्य

राधानगरी : दहा सदस्यसंख्या असलेल्या राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात सर्वाधिक पाच सदस्य निवडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत नसल्याने पुढील वाटचाल कशी राहणार याबाबत उत्सुकता आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सभापतिपदाचा एकमेव सदस्य या पक्षाकडेच असल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. मात्र उपसभापतिपदासाठी समझोता की चिठ्ठी याकडे लक्ष लागून राहिले आहे. विरोधात कॉंग्रसचे चार व शिवसेनेचा एक असे बलाबल आहे. गेल्या साडेसात वर्षांत येथे दोन्ही काँग्रेसमध्ये समझोता एक्स्प्रेस धावत आहे.दहा वषार्पूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमताने सत्ता हस्तगत करत कॉंग्रेसला बाजूला ठेवले होते.मात्र २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणामुळे कॉंग्रेसच्या गजानन बिल्ले यांना उपसभापतिपद देवून सत्तेत सामावून घेतले होते. २०१२ मध्ये पुन्हा हे दोन्ही पक्ष विरोधात लढले. त्यावेळी मित्रपक्षासह दोघांना प्रत्येकी पाच अशा समान जागा मिळाल्या. त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय न राहिल्याने येथून पुन्हा समझोता एक्स्प्रेस धावली.गेल्या पाच वर्षांत चार पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला. या काळात अन्यत्र राजकीय वादविवाद झाले तरीही येथील सत्तेवर त्याचा काही परिणाम झाला नाही त्यामुळे दहापैकी सहाजणांना सभापती व चारजणांना उपसभापती म्हणून संधी मिळाली. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीत कितीही टोकाचा वाद असला तरी जिल्हा परिषदेत त्यांची आघाडी होणार असल्याने येथेही हे दोन पक्ष आघाडी करतील व गेल्या पाच वर्षाप्रमाणे पदांची वाटणी करतील अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विकासाच्या मुद्यावर अशी आघाडी होईल, असे संकेत दिले आहेत. तालुक्यात दोन्ही कॉग्रेस आमने-सामनेनुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची लढत दोन्ही काँग्रेसमध्येच झाली. जिल्ह्यात इतरत्र भाजप व मित्र पक्षांनी बाजी मारली असली तरी येथे मात्र त्यांना संधी मिळाली नाही. काँग्रेसचा मित्रपक्ष स्वाभिमानी संघटना व राष्ट्रवादीचा मित्र जनता दल यांनी त्यांची साथ सोडली पण त्यांनाच याचा फटका बसला. राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या. काँग्रेसला चार व अनपेक्षितपणे शिवसेनेला एक जागा मिळाली. शिवसेनेला मिळालेली जागा जाधव गुरुजी यांच्या गटाची आहे. ते मुळचे काँग्रेसचेच आहेत. शिवाय त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जमत नाही. ते थेट राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.