गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील अर्जुन विठ्ठल पाटील (रा. आदमापूर) यांनी जातिवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार संबंधित महिलेने भुदरगड पोलिसांत दिली आहे. बाळूमामा मंदिर परिसरामध्ये शुक्रवारी (दि.१८) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पीडित महिला घरी एकट्याच होत्या. त्यावेळी अर्जुन पाटील हा त्यांच्या दारात गेला व ये दार उघडतेस की नाही, असे म्हणून दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडल्यानंतर पीडित महिलेला हाताला धरून ओढत नेले, तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तुला सोडणार नाही, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. महिलेने विनयभंग आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.
आदमापूर येथे महिलेच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST