शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावात निकालानंतर मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 01:34 IST

शहरात तणाव : पोटनिवडणुकीत विजयादेवी यादव विजयी

 पेठवडगाव : पालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर यादव आघाडीचे कार्यकर्ते व विरोधी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर विरोधी गटाच्या अज्ञात कार्यकर्त्यांनी यादव गटाच्या चारजणांना, तर यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी गटातील एकास मारहाण केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काहीवेळ व्यवहार ठप्प झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जादा पोलीस कुमक मागवली असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. शहरास पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, या घटनेची नोंद पाच वाजेपर्यंत पोलिसांत झाली नव्हती. विजयानंतर यादव गटाचे कार्यकर्ते यादववाडा येथे जल्लोष करीत होते. त्यानंतर नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ हे कार्यकर्त्यांसह मतदारांचे आभार मानत बी. वाय. शाळेकडे येत होते. पालिका चौकात बॅरेकेटस लावल्यामुळे सर्वजण एस. टी. स्टँडमार्गे जात असताना येथे विरोधी गटाचे कार्यकर्ते थांबले होते. त्यांची व यादव गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक शिवीगाळ झाले. त्यानंतर यादव गटाचे कार्यकर्ते वारणा बझारजवळ आले असता, तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी लाकडी बॅटने यादव गटाच्या ‘त्या’ कार्यकर्त्यास मारहाण केली. अज्ञात हल्लेखोरांनी येथून पलायन केले. मात्र, एक कार्यकर्ता तावडीत सापडला. त्यास यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याची सुटका केली. दरम्यान, या घटनेनंतर यादव गटाचे तीन कार्यकर्ते एस. टी. स्टँडजवळ आले असता पुन्हा विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. व्यापाऱ्यांनी काहीवेळ दुकाने बंद ठेवली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांच्या जलद कृती, दंगल नियंत्रण पथक यांच्यासह पोलिसांच्या तैनातीने परिस्थिती नियंत्रणात आली. (प्रतिनिधी)