मलकापूर : वारुळ (ता. शाहूवाडी) येथे गावात गटारासाठी काढलेल्या खड्ड्यावरून संजय संतू कांबळे (वय ६०) यांना सुभाष दगडू पाटील (वय ४०) याने जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गटारात ढकलून देत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस स्थानकात झाली आहे. .
वारुळ पैकी सपकाळवाडी येथील अंगणवाडीसमोर रस्त्याकडेला गटार बांधण्यासाठी खड्डे काढले आहेत. मंगळवार, १९ जानेवारी रोजी रात्री सात वाजता फिर्यादी संजय कांबळे व प्रकाश पाटील हे गटारासाठी काढलेल्या खड्ड्यासंदर्भात बोलत असताना पाठीमागून संशयित सुभाष पाटील याने येऊन संजय कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गटारात ढकलून दिले. गटारात पडल्याने संजय कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.