शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

फायटर्स स्पोर्टस्, भिडे स्पोर्टस् विजयी

By admin | Updated: January 8, 2015 00:04 IST

प्रत्युत्तरादाखल खेळताना फायटर्स क्लबने १७.१ षटकांत ३ गडी गमवून हे आव्हान पूर्ण केले.

कोल्हापूर : शाहूपुरी जिमखाना येथे सुरू असलेल्या कै. प्रा. संजय देसाई टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज, मंगळवारी झालेल्या सामन्यात फायटर्स स्पोर्टस् व भिडे स्पोर्टस्ने विजय मिळवीत आगेकूच केली. पहिला सामना शाहूपुरी जिमखाना विरुद्ध फायटर्स स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना शाहूपुरी जिमखाना संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या. यामध्ये सिद्धार्थ कोठारीने नाबाद ४० धावा, राम कांबळे याने ३१, तर अवधूत पाटीलने २८ धावा केल्या. गोलंदाजी करताना फायटर्स स्पोर्टस् संघाकडून सुरेश शेट्टीने २ गडी बाद केले; तर रोहित मरळे व महेंद्र शिवशरण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फायटर्स क्लबने १७.१ षटकांत ३ गडी गमवून हे आव्हान पूर्ण केले. फायटर्सकडून फलंदाजी करताना रोहित मरळेने ४४, प्रशांत कोरेने नाबाद ३३ धावा, तर प्रणव आरमारकरने ३१ धावा केल्या. गोलंदाजी करताना शाहूपुरी जिमखाना संघाकडून साईल शिबेने ४, अवधूत पाटील, प्रशांत उगवीने प्रत्येकी एक गडी बाद केला. अशा प्रकारे फायटर्स क्लबने ७ गडी राखून विजय मिळविला. दुसरा सामना भिडे स्पोर्टस् विरुद्ध सांगावकर स्पोर्टस यांच्यामध्ये झाला. भिडे स्पोर्टस्ने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमवून १३९ धावा केल्या. यामध्ये रजत खोपटे ४५ धावा, सचिन आर्दाळकरने ३० धावा केल्या. अनिल सांगावकर संघाकडून गोलंदाजी करताना प्रवीण पाटील, विनायक माने यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले, तर करण सांगावकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सांगावकर संघाने सर्वबाद ११३ धावांपर्यंतच मजल मारली. यामध्ये सांगावकर संघाकडून विश्वजित जगतापने २३, प्रथमेश दिवेकरने १९ धावा केल्या; तर गोलंदाजी करताना भिडे स्पोर्टस्कडून सौरभ शिंगारेने ३, महेश मस्के याने २, तर अमोल पवार व संपत पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. अशा प्रकारे भिडे स्पोर्टस्ने सामन्यात २६ धावांनी विजय मिळविला.