शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान जमिनींसाठी लढा

By admin | Updated: February 2, 2015 00:23 IST

चंद्रकांत यादव : महाराष्ट्र राज्य देवस्थान जमीनधारक शेतकरी संघटनेतर्फे कार्यशाळा

कोल्हापूर : देवस्थानच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करून विक्री झाली असून अद्यापही ती सुरूच आहे. त्या परत मिळविण्यासाठी लढा उभा करून संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन महाराष्ट्र राज्य देवस्थान जमीनधारक शेतकरी संघटनेचे नेते कॉ. चंद्रकांत यादव यांनी आज, रविवारी येथे केले.संघटनेतर्फे रंकाळा स्टॅँड परिसरातील विकास विद्यामंदिर येथे देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतराम पाटील होते.‘शासन आणि देवस्थान इनामधारक शेतकरी एक संघर्ष’ या विषयावर बोलताना चंद्रकांत यादव म्हणाले, ‘सेझ’विरोधात सर्वप्रथम शिस्तबद्ध आंदोलन डाव्या पक्षांनी सुरू केले. एखाद्या कारणासाठी जमीन ताब्यात घ्यायची असल्यास गावसभा घेतली पाहिजे, यासाठी ८० टक्के लोकांची संमती असली पाहीजे, योग्य नुकसानभरपाई दिली पाहिजे, असा कायदा मंजूर करणे सरकारला भाग पाडले. परंतु हा कायदा पायदळी तुडवून नवा जमीन अधिग्रहण कायदा आणण्याचा घाट सरकार घालत आहे. या कायद्याचा मसुदा पाहिला की देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. या जमिनींचे सर्वेक्षण झालेले नाही. या जमिनींवर अतिक्रमण झालेले आहे तसेच या जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतर करून बंगले उभे राहिले आहेत. यासंदर्भात उस्मानाबाद येथील याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने अतिक्रमण संपुष्टात आणून अशा जमिनींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश ३० जुलै २०१०मध्ये काढले होते. राज्यातील कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असा आहे की ज्याठिकाणी वारंवार देवस्थानच्या जमिनीसंदर्भात जिल्हा प्रशासन व राज्य सरकारशी संवाद साधला जातो. जिल्हा प्रशासनाबरोबर दर महिन्याला या विषयावर बैठक होते. अ‍ॅड. अजित चव्हाण यांनी ‘महसूलविषयक कायदे’ या विषयावर मार्गदर्शन करताना या कायद्यातील अनेक खोचक तरतुदींबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या जमिनी १ जुलै १९५७ या ‘कृषक दिनी’ ज्यांनी शेतसारा भरला आहे. अशा लोकांना या जमिनीचे खातेदार मालक म्हणावे असा कायदा सांगतो असे त्यांनी सांगितले. इनाम जमिनीचा लढा न्यायालयीन पातळीवर सोडवायचा असेल तर विधितज्ज्ञांच्या माध्यमातून याचिका दाखल करून सोडविणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.संतराम पाटील यांनी ‘शेतकऱ्यांच्या दशा आणि दिशा’ यावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी संघटना रात्रंदिवस झटणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. वसंत कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. वसंत सिंघन यांनी आभार मानले. यावेळी मदनराव म्हस्के, अ‍ॅड. आर. आर. पाटील, सुनीता कोरे, कमलाकर कांबळे, राजू पाटील, अनंत चौगुले यांच्यासह देवस्थान जमिनधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)भूसंपादनाचा नवीन कायदा धोकादायककायदा पायदळी तुडवून नवा जमीन अधिग्रहण कायदा आणण्याचा घाट सरकार घालत आहे. हा कायदा देवस्थान जमीनधारकांसाठी धोकादायक आहे.देवस्थान जमिनींचे बेकायदा हस्तांतरण झाले असून अतिक्रमणही झाले आहे.‘कृषक दिनी’ शेतसारा भरलेल्या लोकांना या जमिनीचे खातेदार मालक म्हणावे असा कायदा सांगतो.इनाम जमिनीसाठी याचिका दाखल करणे गरजेचे आहे.