शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉर्पोरेट शाळा’ विरोधात लढा शिक्षण वाचवा संघर्ष समिती : बैठकीत निर्णय, शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:09 IST

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.

या निर्णयामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार असून, शिक्षणक्षेत्र उद्योगांना खुले करताना मराठी शाळांची गळचेपी झाली आहे. त्यामुळे या विधेयकाविरोधात सर्व स्तरांतून राज्यभर तीव्र लढा उभा करण्याचा निर्णय ‘शिक्षण वाचवा, संघर्ष समिती’च्यावतीने आयोजित बैठकीत घेण्यात आला.

बिंदू चौक येथील आयटक कामगार कार्यालयात शनिवारी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने ‘कॉर्पोरेट शाळा’ निर्णयाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थितहोते.आॅल इंडिया इलेमेंटरी टीचर्स आॅर्गनायझेनचे (आयफेटो) राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे म्हणाले, सध्याच्या शिक्षणक्षेत्रात अनागोंदी सुरू आहे. सध्या शासन भांडवलदारांना सोयीची धोरणे आखत आहेत. यावर जनता व शिक्षण क्षेत्रांतील इतर घटकच अंकुश ठेवू शकतात.खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे म्हणाले, या शाळा स्वयंअर्थसाहाय्य असणाºया आहेत. त्या निश्चितपणे शुल्क आकारणी करणार. या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळेल, हा प्रश्न निर्माण होणार आहे.प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत म्हणाले, अनेक कॉर्पोरेट कंपन्या सामाजिक कामासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड (सीएसआर)च्या माध्यमातून निधी उपलब्ध करीत असतात. मात्र, हा निधी खरेच शिक्षण क्षेत्राची सुधारणासाठी वापरला जातो का, हे पाहण्याची गरज आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे म्हणाले, कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीचा अंतिम उद्देश हा नफा मिळविणे असतो. त्यामुळे दुर्गम भागातील दहा ते बारा पटसंख्या असलेल्या ठिकाणी या कंपन्या शाळा सुरू करणार नाहीत.आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्यांनी सुरू केलेल्या शाळांकडून अवाजवी शुल्काची आकारणी केली जाईल. ते सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात फक्त शिक्षकांनीच आंदोलन उभे करून नये; तर यासाठी शेतकरी, कामगार वर्ग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी संघटना, पालक संघटना या सर्वांना एकत्र घेऊनच आंदोलन उभे करणे गरजेचे आहे.याप्रसंगी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघाचे राजेंद्र यादव, कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक संघटनेचे अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.बुधवारी परिपत्रकांची होळीकॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करू देण्याच्या विधेयकाच्या परिपत्रकाची बुधवारी (दि. २७) शिवाजी चौक येथे सायंकाळी पाच वाजता होळी केली जाणार आहे. त्यानंतर या निर्णयाबाबत एका परिसंवादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाईल. त्यानंतर संपूर्ण राज्यभर याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी सर्वमताने घेण्यात आला.कोल्हापुरातील बिंदू चौक येथील आयटक कामगार कार्यालयात शनिवारी ‘कॉर्पोरेट शाळा’ निर्णयाविरोधात आयोजित बैठकीत प्रभाकर आरडे यांनी मत मांडले. यावेळी अनिल चव्हाण, गिरीश फोंडे उपस्थित होते.