शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणुकीचा होनेवाडीकरांचा व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणुकीचा होनेवाडीकरांचा वेगळा आदर्श * प्रभागवार बैठकातून इच्छुकांच्या मुलाखतीतून उमेदवारी सदाशिव मोरे। आजरा आजरा तालुक्यातील पाच ...

सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणुकीचा होनेवाडीकरांचा वेगळा आदर्श

* प्रभागवार बैठकातून इच्छुकांच्या मुलाखतीतून उमेदवारी

सदाशिव मोरे। आजरा

आजरा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे, पण होनेवाडी गावची ग्रामपंचायत सलग पाचव्यांदा बिनविरोध करून ग्रामस्थांनी जिल्ह्याला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. प्रभागवार बैठकातून इच्छुकांच्या मुलाखती व समजाकार्य पाहून उमेदवार निवडण्याचे दिव्य कार्य सुकाणू समितीने केले आहे. शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवून आदर्श गाव ही संकल्पना राबविलेले होनेवाडी हे गाव आहे. तंटामुक्त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निर्मलग्राम योजना, आदर्श ग्राम योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. गेल्या पाचवेळा ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध केली आहे. गट-तट पक्ष बाजूला ठेवून विकासकामांसाठी एकत्र येऊन काम करणारे गाव म्हणून होनेवाडी गावाचा उल्लेख केला जातो. ग्रामपंचायतवगळता सर्व निवडणुका अटीतटीने व चुरशीने मतदान करून आपले गावावरील वर्चस्व सिद्ध करण्यात याठिकाणचे नेतेमंडळी हुशार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र सुकाणू समिती, स्वतंत्र बैठका, इच्छुकांच्या मुलाखती, इच्छुक उमेदवारांनी आजपर्यंत केलेले समाजकार्य, त्यांच्याबाबत प्रभागातील नागरिकांची असलेली भूमिका हे सर्व जाणून घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आली.

* विकासासाठी सर्वजण एकत्र

गावातील रस्ते, गटर्स, पाणी योजना यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. नेतेमंडळींची भेट घेणे, त्यांना संबंधित कामाची गरज पटवून सांगणे व ते काम मार्गस्थ लावण्यात ग्रामस्थ संघटित होतात. रक्तदान शिबिरापासून गरजू व्यक्तींना मदत करणे व गावातील विकासासाठी एकत्र येण्याची परंपरा गेली २५ वर्षांपासून होनेवाडी ग्रामस्थांनी ठेवली आहे. ---------------------------------