शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांसह पंधरा पोलिसांची चौकशी

By admin | Updated: February 25, 2017 00:25 IST

‘वारणा’ चोरी प्रकरण : न्यायालयाचा आदेश

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी सांगली-कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार अधिकाऱ्यांसह पंधरा पोलिसांची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सांगलीतील राष्ट्रपती पदकप्राप्त कॉन्स्टेबलसह तिघांची अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कसून चौकशी केली. या गुन्ह्यांतील संशयित आरोपी मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा) याने पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांनी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम उघडकीस आणली होती. त्यानंतर तपासामध्ये वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. ही रक्कम कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टिडेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांची असल्याची त्यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर सांगली पोलिसांनी मैनुद्दीनचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला. येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना कॉलनीतील रूममध्ये आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळून आले. मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्यानंतर सांगली-मिरज येथील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मैनुद्दीनला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्याचे आमिष दाखवून पैशांवर हात मारल्याची चर्चा त्यावेळी पुढे आली होती. बुलेट खरेदी प्रकरणात मिरज गांधी चौक पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ, त्याचा भाऊ साजिद नदाफ हे कागदोपत्री सापडले. त्यांना खात्यातून काढूनही टाकले; परंतु आणखी काही माहीर रेकॉर्डवर आले नाहीत. कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर मैनुद्दीनने सांगली येथील वकिलाच्या मदतीने थेट उच्च न्यायालयात सांगली-कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक शर्मा यांना दिले. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. कायद्यात ४१ (ब) प्रमाणे आरोपीला पोलिस कोठडी देता येत नसताना तुम्ही मागितली कशी, त्याला न्यायालयाने ती कोणत्या मुद्द्यावर दिली. मैनुद्दीनसोबत सौदा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी) वारणा चोरी प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, काही अधिकाऱ्यांसह पोलिसांची चौकशी सुरू आहे. - सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांनी मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम उघडकीस आणली होती.कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर मैनुद्दीनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली