शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

पंधरा मिनिटांत अनेक संसार उघड्यावर!

By admin | Updated: May 5, 2017 00:22 IST

वादळी वाऱ्याचा तडाखा : वाघेरी, मेरवेवाडीत घरांची पडझड; झाडे कोसळली, वीजखांबही जमीनदोस्त; शेतीचे नुकसान

कऱ्हाड/ओगलेवाडी : वादळी वाऱ्यासह बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घराचे छत उडाले. तर काही ठिकाणी घर तसेच वाहनावर झाड मोडून पडले. काही गावांमध्ये वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. तसेच रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी आणि मेरवेवाडी परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने या परिसरात मोठे नुकसान झाले. संजय शिवराम गायकवाड यांच्या घरावरील कौले, राजाराम कोंडिबा गायकवाड यांचे पत्र्याचे शेड, सुदाम कोंडिबा गायकवाड, हणमंत गणपत पवार, अरुण बाबूराव पवार या सर्वांच्या घरावरील कौले, रशिद जाफर मुल्ला, रफीक उमर पटेल, इब्राहिम खाजीमियाँ पटेल, निजाम मुल्ला, अल्लाउद्दीन मुसांडे, इम्रान चांद पटेल, राहुल नेताजी गायकवाड, बापू ज्ञानू पाटोळे, पोपट गोपाळ पाटोळे, अशोक कोळी, प्रकाश बापू साळुंखे, कासिम गुलाबहुसेन पटेल, लक्ष्मण गोविंद माळी, दादामियाँ पटेल, युसूफ शमशुद्दीन पटेल, बाबूराव धोंडी गुरव, हुसेन धोंडी पटेल, मधुकर दत्तात्रय पाटोळे, बरकत मुल्ला, हासिम सुलतान पटेल, महादेव संपत पवार, संगीता सुखदेव साळुंखे, भीमराव अण्णा पवार, लिलाताई भीमराव तुपे यांच्या घरावरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.घरावरील छतच उडून गेल्यामुळे घरात साठवलेले धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. वर्षभरासाठी साठवलेले धान्य भिजल्याने वर्षभर खायचे काय, असा प्रश्न संबंधित कुटुंबासमोर उभा आहे. सुमारे पन्नास ते साठ क्विंटल ज्वारी, गहू, शेंगा तसेच कडधान्य पावसात भिजले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक साहित्यही भिजले आहे. विजेच्या तारा, खांब कोसळले आहेत. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे वाघेरी आणि मेरवेवाडीतील अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)अनेकांना निवारा शोधण्याची वेळपहिल्याच पावसात घराचे छप्पर उडून गेल्याने अनेकांना राहण्यासाठी तात्पुरते घर शोधावे लागत आहे. गुरुवारी काहीजणांनी घराच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. तर काहीजणांनी प्लास्टिक कागद वापरून निवारा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही घरांवरील पत्रा एवढ्या लांबवर जाऊन पडला होता की तो गोळा करतानाही ग्रामस्थांना शिवार तुडवावे लागत होते. करवडीत वीज खांब कोसळलाशामगाव : बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करवडी येथे रस्त्यानजीक असलेला वीज खांब मोडून पडला. या खांबावरील तारा एकमेकांत गुंतल्याने शॉर्टसर्किट होऊन तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, करवडीसह परिसरातील गावांमधील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. गुरुवारी खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.मलकापूर परिसराला तडाखामलकापूर : परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यात वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले. तर भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणीजिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी परिसरातील गावांची पाहणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवास थोरात यांनी दिली.चिंचमळ्यात संरक्षक भिंत कोसळलीचिंचमळा येथे कऱ्हाड-पुसेसावळी रस्त्यालगत गारमेंट कंपनी आहे. या कंपनीभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली असून, बुधवारच्या वादळी वाऱ्यात वीस फूट भिंत जमीनदोस्त झाली. सुदैवाने यावेळी परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.