शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

संकेश्वरजवळ भीषण अपघात; नऊजण ठार

By admin | Updated: October 18, 2015 01:20 IST

मृत चिक्कोडी तालुक्यातील : भाविकांच्या ट्रॅक्सला ट्रकची धडक

संकेश्वर : जोतिबा देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांच्या ट्रॅक्सला मालवाहू ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर महामार्गावर संकेश्वरजवळ म्हसोबा हिटणी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. मृत व जखमी अंकली (ता. चिकोडी) येथील आहेत. मृतात शंकर इराप्पा कुंभार (वय ४५), पापू शिवलिंग कुंभार (६२), महादेव बाळगौंडा पाटील (६०), ज्योती रामगौंडा पाटील (६६), रमेश आप्पासोा पाटील (३८), सोमनाथ कल्लाप्पा बडिगेर (३७), कृष्णा परशराम मोरे (३५), केदारी आप्पासाहेब पाटील (४०) यांचा समावेश आहे. एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींमध्ये राजू हजारे, सुभाष पाटील, प्रवीण पाटील, बाळगौंडा मलगौंडा पाटील (६०, सर्व रा. अंकली), ट्रॅक्सचालक बाळकू चोकावी (रा. सिद्धापूरवाडी, ता. चिकोडी) यांचा समावेश आहे. अंकली (ता. चिकोडी) येथील चौदा जोतिबा भक्त भाड्याच्या ट्रॅक्स (केए २३ एम ८६४६) मधून जोतिबाच्या दर्शनाला गेले होते. घरी परतताना म्हसोबा हिटणी फाट्याजवळ संकेश्वरकडे जाण्यास ट्रॅक्स वळत होती. याचवेळी भरधाव वेगाने मालवाहू ट्रक (टीएन ५२ - ४९५५) हा निपाणीहून संकेश्वरकडे जात होता. या ट्रकने भाविकांच्या ट्रॅक्सला जोरदार धडक दिली. ट्रॅक्स रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या सरकारी रुग्णवाहिकेवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आठ पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले व अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगावच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदत देणार : हुक्केरी रात्री नऊच्या सुमारास संकेश्वर येथे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी भेट घेऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवर संपर्क साधून सरकारतर्फे प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाइकास दोन लाख रुपये मदत देणार असल्याचे सांगितले.