शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

हुपरीत सौभाग्यवतींसाठी पतीराजांकडून ‘फिल्डिंग’_ नगरपालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:42 IST

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील नवनिर्मित नगरपालिकेचा लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना नेत्यांच्या सावध हालचालीशहरांतील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांची शहरातील ताकद जवळजवळ समान

तानाजी घोरपडे ।हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील नवनिर्मित नगरपालिकेचा लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी आरक्षणाने महिलांना दिल्याने काहीअंशी नाराज झालेल्या स्थानिक नेत्यांनी महिला उमेदवार निवडताना अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. ‘मी नाही तर माझी सौभाग्यवती’ असा पवित्रा घेत ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीप्रमाणे या नेत्यांनी आतापासूनच आपल्या सौभाग्यवतीच्या नावाची निवडणुकीच्या सारिपाटावर व्यवस्थित साखर पेरणी सुरू केली आहे.

परिणामी, हा मुस्कटदाबीचा प्रकार सहन होत नसलेल्या सर्वच पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी एखाद्या धनदांडग्याच्या किंवा नेत्याच्या घरात उमेदवारी न देता सर्वसामान्य महिलेलाच उमेदवारी द्यावी, असा हट्ट धरला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या रौप्यनगरी शहरातील राजकीय वातावरण ‘ठंडा ..ठंडा ..कुल ..कुल’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही सर्वच पक्षांमध्ये गटांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे.

रौप्यनगरीवासीयांनी अत्यंत शांततेने उभारलेल्या लोकलढ्याच्या माध्यमांतून सात महिन्यांपूर्वी उदयास आलेल्या नगरपालिकेची पहिलीच निवडणूक पुढील महिन्यात (डिसेंबर) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरांतील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली असून, लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष व पहिला नगरसेवक म्हणून मिरविण्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत. कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (माजी मंत्री, आवाडे गट), भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांची शहरातील ताकद जवळजवळ समान आहे. त्यामुळे युती, आघाडी करून लढल्याशिवाय एकाही पक्षाला यश मिळणे अशक्य असल्याने सर्वच पक्ष राजकीय गोळाबेरीज करण्याच्या कामाला लागले आहेत.

नगरपालिका स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच प्रथम नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पहाणाºयांना गेले दोन महिने आरक्षण सोडतीने अक्षरश: झुलवत ठेवले होते. २ नोव्हेंबरला मंत्रालयात निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षण सोडतीने प्रथम नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पाहणाºया अनेक स्थानिक नेत्यांना जोरदार धक्का बसला असून, त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. नगराध्यक्षपदाच्या मृगजळामागे आपण उगाचच धावत होतो, याची जाणीव झाल्याने व सत्य, वास्तव समोर आल्याने नेतेमंडळी आता भानावर आली असून, राजकीय जोडण्या करण्याच्या कामास लागली आहेत.पहिलीच निवडणूक चुरशीची होणार१ होऊ घातलेली नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक अत्यंत चुरशीने व अटीतटीने होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष मनी व मसल पॉवर असणाºया मातब्बर उमेदवारांच्या शोधात आहेत. या नियमांमध्ये केवळ स्थानिक नेते किंवा एखादे धनदांडगे घराणेच बसू शकते, याची जाणीव सर्वसामान्य कार्यकर्त्याला झाल्याशिवाय राहिली नाही.२ प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी हुकलेले स्थानिक नेते ‘मी नाही तर माझी सौभाग्यवती’ असे म्हणत आपल्याच घरात नगराध्यक्षपद ठेवण्यासाठी आपल्या सौभाग्यवतीच्या नावाची निवडणुकीच्या सारिपाटावरती विविध मागार्ने साखर पेरणी सुरू केली आहे. हा प्रकार सर्वच पक्षांतील सर्वसामान्य व स्वाभिमानी कार्यकर्त्याला रुचत नसल्याने सध्या तो अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.