शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूण हत्याकांड; आणखी दोन एजंटांना अटक

By admin | Updated: March 14, 2017 00:05 IST

स्वातीला संदीप जाधवनेच नेले

सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून, डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या संदीप विलास जाधव (वय ३२, रा. शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), वीरेनगोंडा ऊर्फ बंडू रावसाहेब गुमटे (वय ४३, रा. कागवाड, ता. अथणी) या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अटकेतील संशयितांची संख्या ११ वर गेली आहे. आणखी काही डॉक्टर व एजंट पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके कर्नाटक, कोल्हापूर व सोलापूर जिल्'ात रवाना केली आहेत. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा म्हैसाळ येथे अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. तेथे पुरलेले १९ भ्रूण सापडले. यातील मुख्य संशयित डॉ. खिद्रापुरे याला अटक करण्यात आली. तो कर्नाटकातील कागवाड, विजापूरसह आणखी काही ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून म्हैसाळ येथे गर्भपात करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मृत विवाहितेचा पती प्रवीण जमदाडे याच्यासह डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे, डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगीकर, परिचारिका कांचन रोजे, उमेश साळुंखे, सुनील खेडेकर, सातगोंडा पाटील, यासिन तहसीलदार या दोन एजंटांसह नऊ जणांना यापूर्वी अटक केली आहे. (प्रतिनिधी)कोठडीत वाढअटकेतील डॉ. श्रीहरी घोडके, उमेश साळुंखे, कांचन रोजे, डॉ. रमेश देवगीरीकर, सुनील खेडेकर या पाचजणांच्या पोलिस कोठडीची सोमवारी मुदत संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या कोडठीत १६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. खिद्रापुरेची पोलिस कोठडी १७ मार्चला संपणार आहे. मुंबईतून औषधांचा पुरवठा--खिद्रापुरेला गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा माधवनगरच्या सुनील खेडकर याने केल्याचे निष्पन्न होताच, त्याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी सुरु आहे. तो माधवनगरच्या एका औषध फर्मकडे नोकरीला आहे; पण त्याने ही औषधे मुंबईतील एका कंपनीतून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तो नेहमी या कंपनीतील कामगाराच्या संपर्कात असे. या कामगाराकडून त्याने औषधे घेऊन ती खिद्रापुरेला पुरविली आहेत. कामगाराच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना होणार आहे. दोघांकडून कमिशनअटक केलेला एजंट वीरेनगोंडा गुमटे हा डॉ. श्रीहरी घोडके व खिद्रापुरे या दोघांसाठी काम करीत होता. घोडकेकडे तो महिलांना गर्भलिंग निदान करण्यासाठी, तर खिद्रापुरेकडे गर्भपात करण्यासाठी नेत होता. या बदल्यात दोघांकडून त्याला चार ते आठ हजार रुपये कमिशन मिळत होते. आतापर्यंत त्याने चार प्रकरणात कमिशन घेतले आहे. स्वातीला संदीप जाधवनेच नेलेनव्याने अटक केलेला एजंट संदीप जाधव यानेच स्वाती जमदाडे यांना खिद्रापुरेकडे गर्भपातासाठी नेले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या बदल्यात त्याने खिद्रापुरेकडून चार हजार रुपये कमिशनही घेतले होते. तसे पुरावेही मिळाल्याने रविवारी रात्री पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पथकाने शिरढोण येथे छापा टाकून संदीपला अटक केली.