शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा निविदा अपात्र संस्थेस देण्याचा घाट

By admin | Updated: July 10, 2017 23:30 IST

इचलकरंजी नगरपालिका : नामवंत संस्थेला डावलून विशिष्ट संस्थेसाठी वाटाघाटी

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहर स्वच्छतेसाठीची निविदा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, निविदेसाठी अपात्र ठरलेल्या संस्थेला ठेका देण्याचा उपद्व्याप नगरपालिकेतून सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये नामवंत संस्थेला डावलून विशिष्ट संस्थेला ठेका देण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे कचरा उठावच्या ठेक्याची चविष्ट चर्चा नगरपालिका वर्तुळात आहे.शहरामध्ये दररोज सुमारे १५० टन कचरा गोळा करून तो आसरानगर येथे असलेल्या कचरा डेपोवर टाकला जातो. हा कचरा शहरात असलेल्या २५ वॉर्डांपैकी २० वॉर्डांमध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत गोळा केला जातो, तर अन्य पाच वॉर्डांत कचरा गोळा करण्यासाठी खासगी ठेका देण्यात आला आहे. याशिवाय विशिष्ट ठिकाणी गोळा करण्यात आलेला कचरा ट्रॅक्टर-ट्रॉल्यांमार्फत वाहून नेऊन तो कचरा डेपोवर टाकण्यासाठीसुद्धा खासगी ठेका कार्यरत आहे.अशा प्रकारे शहरातील कचरा जमा करून तो विशिष्ट ठिकाणी टाकण्याचा ठेका नगरपालिकेने एका निविदेमार्फत देऊ केला आहे. त्यासाठी वार्षिक ३ कोटी ४० लाखांची निविदा काढण्यात आली असून, पाच संस्थांनी सदरची निविदा भरली आहे. त्यापैकी दोन संस्था अपात्र ठरल्या असून, उर्वरित तीन संस्था पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या संस्थेमध्ये एक नामांकित संस्था असून, त्या संस्थेऐवजी अपात्र ठरलेल्या संस्थेस ठेका देण्यासाठी नगरपालिकेकडील एक यंत्रणा कार्यरत झाली आहे.प्रशासनाकडून सावळा गोंधळअपात्र ठरलेल्या संस्थेस ठेका मिळण्यासाठी नामांकित असलेल्या संस्थेच्या त्रुटी शोधून त्या फसव्या पद्धतीने समोर मांडण्याचे काम या यंत्रणेने सुरू केले आहे. अपात्र संस्थेची सुपारी घेऊन नगरपालिका व अन्य शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.