शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यांत महिला विश्रांती कक्ष

By admin | Updated: March 9, 2016 00:55 IST

प्रदीप देशपांडे : दोन कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर; ‘प्रतिसाद एएसके’ मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत महिला विश्रांती कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी सांगितले. ते ‘प्रतिसाद एएसके’ या मोबाईल अ‍ॅपच्या अनावरण समारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, ‘प्रतिसाद मोबाईल अ‍ॅप’चे कार्यकारी अध्यक्ष शशांक देशपांडे उपस्थित होते. कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानाजवळील अलंकार हॉल येथे हा समारंभ झाला.पोलीस अधीक्षक देशपांडे म्हणाले, पोलीस ठाण्यात महिला पोलीसांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने अद्ययावत असे विश्रांतीगृह उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामास सुरुवात केली जाईल. ‘प्रतिसाद एएसके’ या अ‍ॅप बद्दल बोलताना ते म्हणाले, राज्यात नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात्ां हे अ‍ॅप सुरू केले आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास वेळेनुसार त्यात बदल केला जाईल. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या अ‍ॅपचे अनावरण केले आहे. दीपाली काळे म्हणाल्या, आज टीव्हीवरील चित्रपट, मालिका यांमधील बीभत्स प्रदर्शनामुळे दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार वाढत आहेत. त्यासाठी नैतिक अधिष्ठान असलेला समाज निर्माण केला पाहिजे.अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख वैष्णवी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, करवीर पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव व पोलीस उपअधीक्षक दिलीप जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.असे इन्स्टॉल करा ‘प्रतिसाद’आपल्या मोबाईलमधील ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये जा.त्यानंतर ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये सर्च आॅपरेशनमध्ये जाऊन प्रतिसाद (एएसके) टाईप करून सर्च करा.त्यानंतर ‘प्रतिसाद एएसके’ सेलेक्ट करा.हा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड / इन्स्टॉलवर क्लिक करा.अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करा.त्यानंतर आपल्याला खाली कोड टाकावा लागणार आहे.