शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अभिप्राय १० मार्चपर्यंत द्या

By admin | Updated: February 19, 2016 00:20 IST

प्रादेशिक आराखडा : विभागीय आयुक्तांच्या सूचना; आराखडा वास्तवदर्शी असावा

कोल्हापूर : कोल्हापूरचा प्रादेशिक आराखडा हा वास्तवदर्र्शी असावा, तो तयार करण्यासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाने स्थापन केलेल्या विविध अभ्यासगटांकडून आलेल्या शिफारशींवर संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांनी आपले अभिप्राय १० मार्चपर्यंत सादर करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी अविनाश सुभेदार, नगररचना विभागाचे पुणे येथील सहसंचालक प्र. ग. भुग्ते, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान, विनायक रेवणकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.कोल्हापूर प्रदेशच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचा साकल्याने विचार करून समितीने सुचविलेल्या शिफारशींवर सकारात्मक पण वास्तवदर्र्शी अभिप्राय अंमलबजावणी यंत्रणांनी द्यावेत, त्यासाठी यंत्रणांनी परस्परांशी समन्वय राखावा, अशा सूचना चोक्कलिंगम यांनी यावेळी दिल्या. रेल्वेमार्गाशी संबंधित विषयांवर आवश्यकता भासल्यास रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांबरोबर पुणे येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, तसेच कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत रेल्वे विभागाने पत्र दिल्यास त्याचा समावेशही प्रादेशिक आराखड्यात करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीमध्ये वाहतूक, परिवहन व दळणवळण, शेती, पाटबंधारे, व्यापार, वाणिज्य, उद्योग विकास, ग्रामीण विकास, जमीन वापर, विकास नियमन व विकास नियंत्रण नियमावली, आदी विविध अभ्यास गट असून, या अभ्यास गटांनी आपल्या शिफारशी कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळासमोर सादर केल्या. ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषणविरहित व प्रवाही राहणे आवश्यक असल्याचे सांगून, कोल्हापूर शहर पंचगंगेच्या प्रदूषणामुळे काविळीच्या प्रभावाखाली आहे यावर नियोजनबद्ध व कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी प्रादेशिक नियोजन मंडळाच्या विविध अभ्यास गटांचे सदस्य, अधिकारी, विविध खातेप्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर-गोवा नवीन रस्त्याबाबत चर्चायावेळी कोल्हापूर ते गोवा अंतर ४० किलोमीटरने वाचविणारा नवीन प्रस्तावित रस्ता, कऱ्हाड-बेळगाव नवीन रस्त्याची प्रस्तावित आखणी, मुदत संपत आलेल्या सदस्यांची मुदतवाढ, कोल्हापूर-इचलकरंजी प्रादेशिक योजनेतील प्रादेशिक उद्यान प्रस्ताव, हातकणंगले व शिरोळ येथे टेक्साईल हब निर्मिती व त्यासाठी आवश्यक सुविधा, कोल्हापूर शहराला नवीन बाह्यवळण रस्ते, ट्रक टर्मिनन्स, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. (प्रतिनिधी)