शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

कोल्हापूर हद्दवाढप्रश्नी मागितला अभिप्राय

By admin | Updated: June 26, 2015 01:11 IST

राज्य शासन : जिल्हा प्रशासनाची असणार तटस्थ भूमिका

कोल्हापूर : राज्याच्या नगरविकास सचिवांनी लेखी सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हद्दवाढीसंदर्भात अभिप्रायाची मागणी केली आहे. हद्दवाढ समावेशास विरोधामुळे एलबीटीसह इतर करप्रणालीचे सर्वसमावेशक धोरण ठरवावे; तसेच महसूल सज्जाप्रमाणे संपूर्ण गावे हद्दवाढीत समाविष्ट करावीत, अशी काहीसी तटस्थ भूमिका असणारा अभिप्राय जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास सादर केला जाण्याची शक्यता आहे. अभिप्रायासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी याबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम हाती घेतले आहे. यानुसार नगरविकास सचिव (क्रमांक २) मनीषा म्हैसेकर यांना अभिप्राय सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव मुख्य सचिवांमार्फत सादर होईल.अभिप्रायातील ठळक मुद्दे : कोल्हापूर महापालिकेत समाविष्ट करण्यात येणारी गावे ही संपूर्ण महसुली हद्दीप्रमाणे समाविष्ट के ल्याची खात्री करावी. काही गट नंबर राहिल्यास त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमणे शक्य होणार नाही. हद्दवाढीत येणाऱ्या गावांसाठी महापालिकेने सर्व सुविधा पुरविणे बंधनकारक राहील. या सोयी पुरविण्याबाबत केलेले नियोजन स्पष्ट करावे. हद्दवाढीतील गावांच्या शासकीय देण्याची जबाबदारी महापालिकेची राहील. शहरात येण्यास काही गावे, तसेच औद्योगिक वसाहतींचा विरोध आहे. या गावांतील मालमत्ता कर, एलबीटी, पाणीपट्टी, आदींबाबत ठोस धोरण निश्चित करणे उचित होईल.हद्दवाढीबाबत सर्वस्वी निर्णय शासनस्तरावरच होणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या अभिप्रायांमुळे हद्दवाढ रखडणे किंवा तत्काळ होणे, असे काही घडणार नाही. महापालिका व इतर विभागाकडून अभिप्रायासंदर्भात आवश्यक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच लवकर राज्य शासनास माहिती सादर केली जाईल. - डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी