शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

फेडरेशनला गूळ खरेदी अशक्यच

By admin | Updated: December 17, 2014 23:59 IST

खरेदी करून विकायचा कुठे : मार्केटिंग फेडरेशनसमोर प्रश्न

राजाराम लोंढे - कोल्हापूर -भात, सोयाबीनप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीमध्ये उतरावे, असा रेटा शेतकऱ्यांचा आहे पण गूळ खरेदी करून ठेवायचा कुठे? त्याची विक्री करायची कुठे? असे अनेक प्रश्न आहेत. येथील गूळ खरेदी करून त्याची विक्री गुजरातमध्येच करावी लागणार असल्याने फेडरेशनला गूळ खरेदी करणे अशक्यच आहे. गुळाला मिळणारा दर पाहता हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. यासाठी शासनाने हमीभाव ठरवून द्यावा व त्यापेक्षा कमी दराने विक्री होत असल्यास मार्केटिंग फेडरेशनाच्या माध्यमातून गुळाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शंभर रुपयांपेक्षा खाली गुळाचे दर घसरल्याने १९७८ ला ‘पुलोद’ सरकारमध्ये तत्कालिन सहकारमंत्री प्रा. एन. डी. पाटील यांनी गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनला उतरले होते. क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ झाली; पण त्यानंतर मार्केट स्थिर राहिले. त्यामुळे फेडरेशनला दोन गाड्या गूळ खरेदी करावा लागला होता. आता तशी परिस्थिती नाही. ३६०० रुपये किंमत निश्चित करून त्याखाली दर येणारा गूळ फेडरेशनने खरेदी करावा, अशी मागणी आहे. तसे झाले तर फेडरेशनाला मोठ्या प्रमाणात रोज गूळ खरेदी करावा लागणार आहे. खरेदी केलेला गूळ ठेवायचा कुठे? हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. त्याचबरोबर रोज विक्री करायची म्हटली तर त्याला मार्केट कोणते, त्यामुळे पुन्हा फेडरेशनलाही गुजरात मार्केटमध्येच गूळ घेऊन जावे लागणार आहे. हा प्रश्न सहजासहजी सुटणारा नाही. शेतकऱ्यांनीच आता पारंपरिकपणा सोडून ग्राहकांची मागणी तसा पुरवठा करायला हवा. अर्धा किलोचे छोटे रवे, पावडर तयार करण्यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे, पण तसे न करता ‘सेस’पुरतेच शेतकऱ्यांशी नाते ठेवण्याची परंपराही बाजारसमितीने जोपासल्याने शेतकरी अडचणीत येण्यात ही बाब कारणीभूत आहे. (समाप्त) समितीचे कोल्ड स्टोरेज कागदावरचगुळाचा हंगाम चार महिन्यांचा असतो. या काळात आवक वाढल्याने साहजिकच दराची घसरण होते. यासाठी हंगामात दर खाली आली की कोल्ड स्टोरेजमध्ये गूळ ठेवायचा आणि बिगर हंगामात मार्केटमध्ये काढल्यास दर चांगला मिळू शकतो. त्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे, पण बाजार समितीचे कोल्ड स्टोरेज अनेक वर्षे कागदावरच राहिले आहे. हमीभावासाठी अडचणी !भात, सोयाबीनप्रमाणे केंद्र सरकारने गुळाचा हमीभाव ठरवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हमीभाव शेती उत्पादित मालाला देता येतो, गूळ हा प्रक्रिया केलेला माल असल्याने त्याला हमीभाव कायद्याने देता येत नाही. मानांकन कसे ठरवायचे ?राज्य शासनाने गूळ खरेदीचे आदेश दिले तर गुळाच्या मानांकनाचा (गुणवत्तेचा) प्रश्न निर्माण होणार आहे. भात, सोयाबीन हमीभावाने खरेदी करताना त्याची आर्द्रता तपासली जाते, पण गुळाचे मानांकन कसे ठरवायचे ? असा पेच राहणार आहे.