शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पोलिसांचा धाक कमी होतोय

By admin | Updated: December 19, 2014 00:24 IST

पोलीस करतात तरी काय ? : इचलकरंजीत चोऱ्यांसह वाटमारीचे प्रकार वाढले

अतुल आंबी - इचलकरंजी --येथे सहायक पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, वीस पोलीस अधिकारी आणि सुमारे ३०० पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. तरी शहर आणि परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, वाटमारी, घरफोड्या यासह आता पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन अशा घडामोडींमुळे पोलीस नेमके करतात तरी काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. यावरून पोलिसांचा धाक कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरात गेल्या सहा महिन्यांपासून चोऱ्या, घरफोड्या करून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ‘धूम स्टाईल’ने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार तर दिवसाढवळ्या सर्रास सुरू आहेत. आता यामध्ये वाढ होत वाटमारी, लूट आणि वेळप्रसंगी मारहाण, चाकूहल्ला, असे प्रकार घडत आहेत. खंडणीसाठी धमक्या देऊन मारहाण करून वसुली करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार येत नसल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. तर कित्येक प्रकरणांत मिटवा-मिटवी करून किरकोळ स्वरूपाची तक्रार दाखल करून घेतली जाते. त्यामुळे खंडणी मागायला येणाऱ्या गावगुंडांना काही तरी देऊन ‘तडजोड’ करण्याशिवाय व्यापारी, उद्योजकांकडे पर्याय राहिला नाही. गेल्या काही दिवसांपासून कामगारांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल, पगाराची रक्कम काढून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत काही तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद झाल्या, तर काहींनी उपयोग होत नाही म्हणून सोडून दिले आहे. सोमवारी रात्रीही असाच प्रकार सोनाराच्या बाबतीत घडला. ते दुकान बंद करून चार तोळे दागिने व साठ हजार रुपये रोख रक्कम घेऊन आपल्या गावी परत जात असताना तारदाळ-निमशिरगाव मार्गावर त्यांना अडवून हातातील बॅग काढून घेण्याचा प्रयत्न वाटमारी करणाऱ्या गुंडांनी केला. यावेळी त्याला विरोध करताना या गावगुंडांनी त्यांच्यावर चाकूहल्ला करून सराफ व्यावसायिकाकडील बॅग त्यांनी लुटून नेली.मागील आठवड्यात यंत्रमाग कामगाराला अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल काढून घेण्यात आला. त्यावेळी त्या कामगाराने आपल्यासह याआधी चार कामगारांना अशा प्रकारे अडवून मोबाईल व रोख रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. औद्योगिक वसाहतीतही एका मेंडिंग एजंटाला कारखान्यात गाठून एका टोळक्याने खंडणीची मागणी केली. त्यावेळीही पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल न करता वाटमारीचा गुन्हा नोंद केला. असे प्रकार शहर व परिसरात नेहमी घडत असल्याने नागरिकांसह व्यापारी, उद्योजकांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. पोलीस दलाची गुंडांवर दहशत निर्माण होण्याऐवजी गुंडांचीच दहशत निर्माण होत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून पोलीस दलाच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अशा गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.१८ ते २२ वयोगटांतील तरुणांचा समावेशशहर व परिसरात झालेल्या घरफोड्या, चोऱ्या अशा प्रकरणांत सापडलेले चोरटे अल्पवयीन किंवा १८ ते २२ या वयोगटांतील असल्याचे दिसून आले. चोरी, घरफोडी, वाटमारी करून, पैसा मिळवून चैनी करण्याची सवय या युवा वर्गाला लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, पोलीस खाते यांच्यासह पालक, शिक्षक यांनी तरुणांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.