संजय थोरात -- नूल --गणित म्हटलं की विद्यार्थ्यांना मोठे टेन्शन येते. तसा हा विषय त्यांच्या आवडीचा. मात्र, गणिताच्या गमती-जमतीतून हा अवघड विषय एका प्राथमिक शिक्षकाने सोप्या भाषेत मॉडेलद्वारे मांडला आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या गणिताच्या संकल्पना एकत्रित मांडून त्या मूर्त स्वरूपात दाखविणाऱ्या या अवलिया शिक्षकाचे नाव आहे महेश धोंडिबा घुगरे. घुगरे हे नूल (ता. गडहिंग्लज) येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत सेवेत आहेत. गणिताची सूत्रे, किचकट संकल्पनांमुळे विद्यार्थी शालांत परीक्षेत नापास होतात हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी चिकित्सक अभ्यास करून एक मॉडेल तयार केले. अल्पखर्चिक व टाकाऊ पदार्थांपासून त्यांनी ते तयार केले आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातील अनेक घटकांची त्यांनी सोप्या व सरळ भाषेत मांडणी केली आहे. वर्तुळाची संबोधने, हस्ताक्षर सुधारणेची अक्षर पाटी, मनकवड्यांचा खेळ, गणिती संदेश, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकारांची शिडी, परिमय संख्यांची बेरीज, घड्याळी कोन, पूर्णांक, अपूर्णांक, दशमान परिणामांचे रूपांतरण, संख्यांच्या स्थानिक किमती काढणे, आदी बाबींचा या मॉडेलमध्ये समावेश आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
घुगरेंनी घालवली विद्यार्थ्यांची गणिताची भीती
By admin | Updated: January 4, 2016 00:54 IST