शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पडलेल्या उसामुळे ‌वाडे मिळविताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST

जहाँगीर शेख : कागल : कागल परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठे ...

जहाँगीर शेख : कागल : कागल परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हजारो हेक्टर ऊस जमीनदोस्त झाला होता. सुदैवाने उत्पादनात फारशी घट झाली नसली तरी जनावरांच्या हक्काचा चारा असणारे ‘‌‌वाडे’ मिळविताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. ऊस खाली पडल्याने त्याचे शेंडे सुकून गेले आहेत, अथवा तुटले आहेत.

उसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, दूध उत्पादक आणि पशुधन पालक उसाचे वाडे चारा म्हणून उपयोगात आणतात. निम्माहून अधिक ऊसतोडणी चारा मिळण्याच्या उद्देशानेच केली जाते. ऊसतोडणी मजूर आपल्यापुरता हा चारा ठेवून उर्वरित विक्री करतात. मात्र, यावर्षी कागल परिसरात ऊस मोठ्या प्रमाणात पडलेला असल्याने या दोन्ही घटकांना अधिकचा चारा मिळविताना दमछाक करावी लागते. मात्र, ऊस पीक मुबलक असल्याने अजून या वैरणीची टंचाई भासत नाही. इतर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांनाही वैरण विक्रीतून फारसा लाभ मिळताना दिसत नाही.

सातच्या आत बिंडा गोठ्यात..

शेती आणि खासगी नोकरी मजुरीच्या जोडीला एक दोन गायी, म्हशी पाळण्याचा ट्रेंड आहे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी वैरणीची जोडणी करण्याचा प्रयत्न असतो. ऊसतोडणी मजुरांशी जवळीक साधलेली असते. त्यामुळे कोठे ऊसतोडणी आहे, हे आदल्या दिवशी समजते. पहाटे ऊसतोडणी मजूर येण्यापूर्वीच हे वैरणवाले फडात हजर असतात. सकाळी सातला दुचाकीवरून बिंडा घरात नेलेला असतो. असे चित्र या भागात आहे.

वैरणीसाठी ऊसतोडणी मजूर.. उसतोडणी मजुरासाठी बीड परिसरातील लोकांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, रोख पैसे, उचल घेऊनही न येण्याचे प्रकार सरास होत आहेत. त्यातून कारखाना व्यवस्थापणाने स्थानिक टोळी तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या ऊसतोडणी मजुरांच्या टोळीत वैरणही हवी तेवढी मिळते आणि मजुरीही. या हिशेबाने स्थानिक लोक सहभागी झाले आहेत.