शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखोची/पेठवडगाव : लाटवडे (ता. हातकणंगले) येथे वेडाच्या भरात वडिलाने स्वत:च्या मुलीस विहिरीत ढकलून देऊन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश श्रीपती यादव (वय ३७) व परिती (६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.लाटवडे येथे भादोलेकडे जाणाºया रस्त्याजवळ प्रकाश यादवचे घर आहे. प्रकाश गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखोची/पेठवडगाव : लाटवडे (ता. हातकणंगले) येथे वेडाच्या भरात वडिलाने स्वत:च्या मुलीस विहिरीत ढकलून देऊन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश श्रीपती यादव (वय ३७) व परिती (६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.लाटवडे येथे भादोलेकडे जाणाºया रस्त्याजवळ प्रकाश यादवचे घर आहे. प्रकाश गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी पत्नी कोल्हापूर येथे ब्यूटी पार्लरच्या प्रशिक्षणासाठी गेली, तर आई कामानिमित्त गावात गेली असता घरात कोणी नाही हे पाहून प्रकाशने घराजवळील स्वत:च्या विहिरीत परितीस ढकलून दिले. त्यानंतर घरात जाऊन तुळईला साडीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली.मोठा भाऊ चंद्रकांत हा भादोले येथून आपल्या पत्नीला नेण्यासाठी आला. त्यावेळेस घराला पुढील व मागील दाराला कडी असल्याचे दिसले. त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याने प्रकाश यास आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मागील बाजूचे दार तोडून त्याने आत प्रवेश केला. प्रकाशने गळफास लावल्याचे आढळले. परितीही घरात न आढळल्याने चंद्रकांतने विहिरीत पाहिले. मोटारीने पाणी उपसल्यानंतर परितीचा मृतदेह दिसला. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भादोले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास पोलीस निरीक्षक यशवंत गवारी करीत आहेत...अन् डोळे पाणावलेप्रकाश पेठवडगाव येथील सलून दुकानात काम करीत होता. परिती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होती. तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर सुटी असतानाही तिने शाळेचा गणवेश परिधान केल्याचे दिसल्याने सर्वांचेच डोळे पाणावले.