शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

‘महामंडळ’समोर उपोषणाचा इशारा

By admin | Updated: November 30, 2014 23:56 IST

भालचंद्र कुलकर्णी : चित्रपट महामंडळ बरखास्त करण्याची मागणी

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात पहिल्यादांच प्रसाद सुर्वे यांच्या रूपाने राजकीय हस्तक्षेप झाला. महामंडळात मनमानी पद्धतीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. चित्रपट महामंडळ भ्रष्टाचारी संचालकांच्या विळख्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाची विद्यमान कार्यकारिणी त्वरित बरखास्त करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा १ जानेवारीपासून महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीचे कार्याध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.श्री. कुलकर्णी म्हणाले, महामंडळातील अनेक संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. प्रसाद सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंजुरी नसताना सुमारे ५८ लाख रुपयांचा चुराडा केला. दोन महिन्यांनी खर्चास मंजुरी घेतली. फेर लेखापरीक्षणात उल्लेख असलेल्या रकमांची व हिशेबांची मुदत देऊनही उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, प्रमुख कार्यवाह सुभाष भुरके, विजय पाटकर, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांनी का पूर्तता केली नाही, १० नोव्हेंबर २०१३ रोजीच्या कार्यकारिणीत अष्टेकर, सुर्वे यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा ठराव करण्यात आला पण सुर्वेंचे सभासदत्व रद्द झालेले नाही. भालचंद्र कुलकर्णी व निर्माते मेघराज राजेभोसले व काही माजी संचालकांनी महामंडळातील भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत विद्यमान कार्यकारिणी मूग गिळून गप्प बसली आहे.न्यायालयीन खर्च व्यक्तिगत करणे अपेक्षित असताना महामंडळावर टाकला जात आहे. मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्णानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. विजय कोंडके यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संचालकावर कायदेशीर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. यावेळी मेघराज राजेभोसले, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, छाया सांगावकर आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )प्रमुख आक्षेप....मंजुरी नसताना ५८ लाखांचा खर्च, दोन महिन्याने मंजुरी घेतली.महामंडळाची बदनामी करणाऱ्या सुर्वेंवर कारवाई का नाही?विद्यमान कार्यकारिणी ठोस कारवाई करत नाही.महामंडळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार.